कोल्हापूर जिल्ह्यातील २० हजार ३१० ग्राहकांना रेशनचे धान्य आता कधीच मिळणार नाही. (Preparations)कारण, यामध्ये काही शासकीय नोकर, ज्यांनी गेल्या सहा महिन्यांत धान्य घेतलेले नाही. तसेच मृत व्यक्तींचाही समावेश आहे. यांच्यापैकी कोणी पुन्हा धान्य सुरू करण्याची मागणी केली, तर ते निकषांत बसतात का, हे पाहून पुन्हा त्यांना धान्य सुरू करण्यात येईल.सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून जिल्ह्यातील खूप मोठा वर्ग धान्य घेतो. अन्न सुरक्षाअंतर्गत त्यांना हे धान्य दिले जाते. यामध्ये केशरी, पिवळे आणि पांढरा अशा तीन रंगांच्या शिधापत्रिका आहेत. यातील केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिकांना रास्तभाव दुकानातून धान्य वितरित केले जाते.

मात्र, यातील काही शिधापत्रकधारक हे शासकीय कर्मचारी आहेत.(Preparations) तसेच काही शिधापत्रिकधारकांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे यांनी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत रास्तभाव दुकानातील धान्य घेतलेले नाही.गेल्या काही वर्षांपासून बोटाचे ठसे घेऊन धान्य वितरित केले जात असल्याने कोणत्या ग्राहकाने किती काळ धान्य घेतलेले नाही, हे लक्षात येते. तसेच ग्राहकांचे आधार कार्ड जोडल्याने त्यांची सर्व माहिती शासनाकडे उपलब्ध झाली आहे.
यातून राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील धान्य न घेणाऱ्या किंवा शासकीय सेवेत (Preparations)असणाऱ्या रेशन ग्राहकांची एक सुची जिल्हा पुरवठा विभागाला पाठविली आहे.या यादीचा आढावा घेऊन जिल्हा पुरवठा विभागाने या २० हजार ३१० ग्राहकांचे रेशनचे धान्य बंद केले. त्यातील काही जणांनी जर पुरवठा विभागाशी संपर्क केला, तर निकष पाहून त्यांचे धान्य सुरू केले जाईल.
हेही वाचा :
पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू
भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात; वडेट्टीवारांचा दावा, सुधीर मुनगंटीवार म्हणाले…
सर्वात मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद