देशभरातील वाहनचालकांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे.(plaza) महामार्गांवरील टोल प्लाझांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी केंद्र सरकार टोल वसुलीच्या पद्धतीत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. या नव्या निर्णयामुळे भविष्यात टोल नाक्यांवर वाहनचालकांना रोख रकमेचा वापर करता येणार नाही, अशी शक्यता आहे.सध्या अनेक ठिकाणी फास्टॅग असला तरी कॅश व्यवहार सुरू आहेत. मात्र आता सरकार टोल वसुली पूर्णपणे डिजिटल आणि कॅशलेस करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहे. यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचेल, तसेच टोल प्लाझांवरील रांगा आणि वादविवाद कमी होतील, असा सरकारचा उद्देश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या आर्थिक वर्षापासून टोल प्लाझांवर फक्त फास्टॅग (plaza) किंवा यूपीआयद्वारेच टोल भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. फोनपे, गुगल पे, भीम यूपीआयसारख्या अ‍ॅप्सद्वारे थेट डिजिटल पेमेंट करावे लागेल. रोख व्यवहार पूर्णपणे बंद केले जाणार असून, कॅश देणाऱ्या वाहनांना पुढे जाण्याची परवानगी मिळणार नाही, अशी अट लागू होऊ शकते. या निर्णयामुळे टोल वसुली प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल आणि महसूल गळतीही थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच, महामार्गांवरील प्रवास अधिक वेगवान आणि सुकर होणार आहे.

केंद्र सरकारकडून हा निर्णय येत्या आर्थिक वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे. (plaza) म्हणजेच 1 एप्रिलनंतर टप्प्याटप्प्याने देशभरात ही व्यवस्था अंमलात आणली जाऊ शकते. केंद्रीय महामार्ग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात संकेत दिले असून, लवकरच अधिकृत तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.या नव्या व्यवस्थेमुळे वाहनचालकांना टोल नाक्यावर जास्त वेळ थांबावे लागणार नाही आणि प्रवास अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स

Windows 10 आणि 11 युजर्सना अलर्ट, CERT-In चा इशारा, जाणून घ्या

यंदाच्या बजेटमधून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट, जनधन खातेधारकांसाठी महत्त्वाचा बदल होणार?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *