राज्यातच नव्हे तर देशभरात ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाच्या हालचालींना (golden) विशेष महत्त्व दिलं जातं. 24 जानेवारी 2026 रोजी मंगळ ग्रह अभिजित नक्षत्रात प्रवेश करणार असून, यामुळे काही राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मंगळाला ग्रहांचा सेनापती मानलं जातं आणि त्याचं संक्रमण मानवी जीवनावर थेट परिणाम करतं, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.या संक्रमणामुळे काही राशींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा, करिअरमध्ये प्रगती, तसेच नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे चार राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार असून, पैसा, प्रतिष्ठा आणि यश यामध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते, असा दावा करण्यात येत आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, अभिजित नक्षत्राला विजयाचं प्रतीक मानलं जातं.(golden) हे नक्षत्र सर्व दोषांपासून मुक्त असून, या काळात केलेल्या कामांना यश मिळतं, असं सांगितलं जातं. 24 जानेवारी रोजी मंगळ या नक्षत्रात प्रवेश करणार असल्याने त्याचा प्रभाव अधिक शक्तिशाली मानला जात आहे. ऊर्जा, धैर्य, शौर्य आणि भूमीचा कारक असलेला मंगळ जेव्हा अनुकूल स्थितीत असतो, तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडतात. या संक्रमणामुळे काही लोकांच्या अडचणी कमी होऊ शकतात, रखडलेली कामं मार्गी लागू शकतात आणि आर्थिक लाभाचे योग तयार होऊ शकतात. विशेषतः करिअर, व्यवसाय, गुंतवणूक आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतीत मोठे बदल पाहायला मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मेष राशीसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे. मंगळ हा स्वतः मेष राशीचा अधिपती असल्याने आत्मविश्वासात वाढ होईल. रखडलेली सरकारी कामं पूर्ण होऊ शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता असून, वडिलोपार्जित मालमत्तेतून आणि गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो.सिंह राशीच्या लोकांसाठी हा सन्मान आणि नेतृत्वाचा काळ मानला जात आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील आणि वरिष्ठ पदावर जाण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात नफा वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. अनेक योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. (golden) रखडलेल्या योजना मार्गी लागू शकतात. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थैर्य मिळू शकतं.मकर राशीसाठी मंगळाचं संक्रमण करिअरमध्ये मोठी झेप घेऊन येणार असल्याचं सांगितलं जात आहे. विशेषतः तांत्रिक क्षेत्र, अभियांत्रिकी आणि रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांना मोठं यश मिळू शकतं. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि जुनी कर्जं फेडण्याची संधी मिळेल. सामाजिक प्रतिष्ठाही वाढण्याची शक्यता आहे.
ही वाचा :
स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल
रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक
कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत