देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. (receive)प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच 22 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. जानेवारी महिना संपत आल्याने आता फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सरकारकडून मोठी घोषणा होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपये जमा होण्याची आशा आहे.पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांत थेट खात्यात जमा केली जाते.

मागील हप्त्यांच्या वेळापत्रकानुसार दर चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो. (receive)त्यानुसार, 22 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.शेतकऱ्यांचा हप्ता अडू नये यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक वेळा ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे पैसे थांबवले जातात. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपली ई-केवायसी पूर्ण झाली आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी.भू-सत्यापन प्रक्रिया देखील काही राज्यांमध्ये अनिवार्य करण्यात आली आहे.
तसेच आधार कार्ड, बँक खाते आणि जमीन नोंदीतील माहिती अचूक असणे आवश्यक आहे. (receive)नावातील स्पेलिंग, खाते क्रमांक किंवा आधार क्रमांकातील छोटीशी चूकही हप्ता रोखू शकते.शेतकऱ्यांनी अधिकृत पीएम किसान पोर्टलवर लॉग इन करून आपली माहिती तपासावी किंवा जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन आवश्यक दुरुस्त्या करून घ्याव्यात. सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास 22 व्या हप्त्याची रक्कम कोणत्याही अडथळ्याविना थेट खात्यात जमा होईल.
हेही वाचा :
स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल
रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक
कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत