व्हॉट्सअॅपवर सध्या “तुमचा APAAR ID तयार करण्यात आला आहे”(scam) असे मेसेज लोकांना प्राप्त होत असून हा एक नवीन आणि अत्यंत धोकादायक सायबर स्कॅम ठरत आहे. ‘अपार’ हा केंद्र सरकारचा विद्यार्थ्यांसाठीचा अधिकृत डिजिटल आयडी आहे, ज्याचा वापर करून सायबर भामटे सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत. “तुमचा आयडी यशस्वीरित्या तयार झाला आहे, अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा,” अशा स्वरूपाचे मेसेज पाठवून युझर्सना जाळ्यात ओढले जात आहे.या सायबर scam ची पद्धत अत्यंत चलाख आहे. मेसेजमध्ये दिलेली लिंक दिसायला सरकारी वेबसाईटसारखी वाटते, पण त्यावर क्लिक करताच तुमच्या फोनचा ताबा हॅकर्सकडे जाऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते.

अनेकदा या लिंकवर क्लिक केल्यावर एक बनावट फॉर्म उघडतो, (scam) जिथे तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर आणि बँक डिटेल्स विचारले जातात. एकदा का ही माहिती हॅकर्सच्या हाती लागली की तुमच्या बँक खात्यातून पैसे लंपास केले जाऊ शकतात किंवा तुमच्या नावावर बेकायदेशीर व्यवहार केले जाऊ शकतात.’अपार’ आयडी हा प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी आहे आणि तो शाळा किंवा महाविद्यालयांमार्फत अधिकृत प्रक्रियेद्वारे बनवला जातो. सरकार अशा प्रकारे वैयक्तिक व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यास सांगत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून ‘अपार’ आयडी संबंधित मेसेज आला, तर त्यावर चुकूनही क्लिक करू नका. असे मेसेज हे केवळ फिशिंग (Phishing) अटॅक असून तुमची आर्थिक आणि वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी आखलेले जाळे असते.

स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. (scam) अशा प्रकारचे संशयास्पद मेसेज आल्यास ते तातडीने रिपोर्ट आणि ब्लॉक करा. कोणत्याही अनधिकृत लिंकवर आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका. जर तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाची फसवणूक झाली असेल तर त्वरित १९३० या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. सतर्क राहा आणि तंत्रज्ञानाचा वापर करताना सावधगिरी बाळगा..कारण तुमची एक छोटीशी चूक मोठ्या आर्थिक नुकसानाला निमंत्रण देऊ शकते.

हेही वाचा :

स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल

 रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक

कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *