मोबाईल हातात असले तरी इंस्टा, यूट्यूब, फेसबुक, स्नॅपचॅट किंवा (internet)एक्स पूर्वीचे ट्वीटर .. हे सगळ आता बंद होणार आहे. आंध्र प्रदेश सरकार लवकरच १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर कठोर बंदी घालण्याची तयारी करत आहे. हे राज्य भारतात असे पाऊल उचलणारे पहिले राज्य ठरण्याची शक्यता आहे. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला जाणार आहे.राज्याचे it आणि मानव संसाधन विकास मंत्री नारा लोकेश यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात ही महत्त्वाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाने अलीकडेच १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर पूर्ण बंदी घातली आहे. त्याच धर्तीवर आंध्र प्रदेशही कायदा आणण्याचा विचार करत आहे. लोकेश म्हणाले, “एका विशिष्ट वयाखालील मुलांनी सोशल मीडियावर राहू नये. त्यांना तिथे काय चालले आहे, ते योग्य-चुकीचे फरक समजत नाही. वाईट कंटेंट, सायबर बुलिंग, व्यसन यामुळे मुलांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. म्हणून मजबूत कायदेशीर चौकट आवश्यक आहे.”

ऑस्ट्रेलियाच्या कायद्यानुसार १६ वर्षांखालील मुलांना नवीन अकाउंट(internet) बनवता येणार नाहीत आणि जुनी अकाउंट्सही बंद करावी लागतील. सोशल मीडिया कंपन्यांना वयाची कडक तपासणी करावी लागेल, अन्यथा मोठा दंड होईल. ब्रिटनसारख्या इतर देशांनेदेखील असेच पाऊल उचलले आहे. आंध्र प्रदेश सरकार आता या कायद्याचा सखोल अभ्यास करत आहे. एक समिती नेमली जाणार असून लवकरच कायदा मांडला जाऊ शकतो.

Tdp चे राष्ट्रीय प्रवक्ते दीपक रेड्डी यांनी सांगितले की लहान (internet)मुले इंटरनेटवरील हानिकारक गोष्टी ओळखू शकत नाहीत. मागील सरकारमध्ये सोशल मीडियाचा गैरवापर झाला, महिलांविरुद्ध अपशब्द वापरले गेले, पण कारवाई झाली नाही. आता हा कायदा मुलांना ऑनलाइन धोक्यांपासून वाचवेल. लोकांनी याला सेन्सॉरशिप समजू नये, हे फक्त मुलांच्या संरक्षणसाठी आहे, असे ते म्हणाले.पालकांच्या संमतीने काही कंटेंट पाहता येईल पण स्वतःचे अकाउंट चालवता येणार नाही. हा बदल मुलांसाठी इंटरनेटचा पूर्ण बंदी नाही, तर सुरक्षित वापरासाठी पाऊल आहे. आंध्रप्रदेशातील लाखो कुटुंबांसाठी हा मोठा निर्णय असणार आहे. मुलांचे बालपण सुरक्षित राहावे यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत आहे. हा निर्णय यशस्वी झाला तर इतर राज्यांनाही प्रेरणा मिळू शकते

हेही वाचा :

स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल

 रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक

कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *