सध्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांकडेच WhatsApp आहे.(parents) त्याचा वापर कसा करायचा? हे सुद्धा त्यांना व्यवस्थित कळतं. बऱ्याचदा लहान मुलांसाठी त्याचे पालक घरामध्ये एक फोन ठेवतात. जेणेकरुन त्यांची वेळोवेळी विचारपुस केली जाईल. तर व्हॉट्सअॅपच्या मदतीने त्यांना व्हिडीओ कॉलसुद्धा करता येईल.याच हेतूने पालक मोबाइल घरी ठेवतात. पण काही वेळेस त्यांच्या नकळत काही लिंक्स किंवा ओटीपीवर क्लिक होऊ शकतं. त्याने तुमचा मोबाइल आणि पर्सनल माहिती हॅक केली जाऊ शकते. याचाच विचार करुन WhatsAppने नवे फिचर आणले आहे. पुढील लेखात आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

नव्या Primary Controls या फीचरमुळे पालकांना आपल्या मुलांसाठी .(parents) मर्यादित वापराचा Secondary WhatsApp Account तयार करता येणार आहे. या अकाउंटच्या माध्यमातून मुलांचा व्हॉट्सअॅप वापर सुरक्षित आणि नियंत्रित ठेवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.फीचर ट्रॅकर WABetaInfo च्या माहितीनुसार, या नव्या फीचरमध्ये पालक स्वतःच्या व्हॉट्सअॅप अकाउंटमधूनच मुलांचे सेकंडरी अकाउंट सेटअप करू शकतील. हा पर्याय फक्त व्हॉट्सअॅपची किमान वयोमर्यादा पूर्ण करत नाहीत किंवा ज्यांच्यासाठी मर्यादित अॅक्सेस आवश्यक आहे. त्यांनाच करता येणार आहे. या अकाउंटमध्ये मुलांना फक्त सेव्ह केलेल्या कॉन्टॅक्ट्सशीच चॅट करता येईल. त्यामुळे अनोळखी व्यक्तींशी संपर्क होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल.
सेटअप करताना पालकांना सर्वप्रथम QR कोड स्कॅन करावा लागेल..(parents) मग मुलांचे अकाउंट लिंक करावे लागेल. यासोबतच 6 अंकी Primary PIN तयार करायला लागेल. कोणत्याही महत्त्वाच्या सेटिंगमध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला हाच PIN आवश्यक राहणार आहे. सेकंडरी अकाउंटमध्ये अपडेट्स टॅब, चॅनल्स, ब्रॉडकास्ट्स तसेच Chat Lock यांसारखे काही फीचर्स उपलब्ध नसतील.महत्त्वाचं म्हणजे, मुलांच्या मेसेज आणि कॉल्सची गोपनीयता कायम राहील. एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमुळे पालक थेट चॅट वाचू शकणार नाहीत, मात्र नवीन कॉन्टॅक्ट जोडला गेला की नाही किंवा अकाउंटमध्ये काही महत्त्वाचा बदल झाला आहे का, याची माहिती त्यांना मिळेल.
हेही वाचा :
स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल
रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक
कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत