येत्या आठवडाभरात हातकणंगले तालुक्यात भाजपला मोठे खिंडार पडण्याची (Earthquake) शक्यता वर्तवली जात आहे. ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले तसेच त्यांचे समर्थक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या घडामोडीमुळे हातकणंगलेसह परिसरातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, अरुण इंगवले यांचे कनिष्ठ बंधू राजू आणि अमर इंगवले हे भाजपची साथ सोडण्यास तयार नसल्याचीही चर्चा आहे, त्यामुळे इंगवले घराण्यातच वेगवेगळे राजकीय प्रवाह स्पष्ट होत असल्याचे चित्र आहे.

२०१४ मध्ये देशात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर २०१६ साली इंगवले (Earthquake) गटाने भाजपशी युती करत पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर विविध पदांच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात भाजपचे वर्चस्व मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र अलीकडच्या काळात इचलकरंजी आणि कोल्हापूरमधील भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची भावना इंगवले गटात वाढत गेली. याच पार्श्वभूमीवर भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
महायुतीतील शिवसेना शिंदे गटाशी इंगवले यांची जवळीक खासदार धैर्यशील (Earthquake) माने यांनी साधल्याचे सांगितले जाते. त्यासाठी इंगवले यांच्या निवासस्थानी काही बैठका झाल्या असून पक्षप्रवेशाबाबतची दिशा जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या एक तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा असून रेंदाळ, रुई आणि रुकडी येथे रोड शो तर आळते येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले की, अरुण इंगवले(Earthquake) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश निश्चित असून एक तारखेला औपचारिकता पूर्ण होईल, याबाबत थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. मात्र, अरुण इंगवले यांनी पक्षप्रवेशाची चर्चा सुरू असल्याचे मान्य करताना अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सूचित केल्याने हातकणंगले तालुक्याचे राजकारण पुढील काही दिवसांत अधिकच तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
PM आवास योजनेचे नियम बदलले! आता ‘या’ लोकांना घरकुलाचा लाभ मिळणार नाही
बंद झालेला ₹१५०० चा हप्ता पुन्हा सुरू होणार? e-KYC वर मंत्र्याची मोठी घोषणा
फेब्रुवारीत ६ राजयोगांमुळे ‘या’ ५ राशींचे नशीब चमकणार, सुवर्णदिवस येणार