बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (attack)अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या अपघातात त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक, पायलट आणि कर्मचारीही मरण पावले. अजितदादांच्या जाण्याने पवार कुटुंबासह लाखो समर्थकांना जबर धक्का बसला असून, राज्यभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.या दुःखद घटनेनंतर हजारो कार्यकर्त्यांनी बारामतीत आणि काटेवाडी येथे येऊन अजितदादांचं अंत्यदर्शन घेतलं. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात झालेल्या अंत्यसंस्कारावेळी “परत या अजितदादा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते आणि आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना भावनांचा बांध फुटला होता.

बुधवारी सकाळपासूनच अजित पवार यांचे समर्थक, चाहते (attack)आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर जमले होते. काटेवाडी येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आल्यानंतरही हजारोंच्या संख्येने लोकांनी येऊन श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि नागरिक भावनाविवश झाले होते.अजितदादांच्या कार्यकाळात त्यांनी बारामती आणि राज्याच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण काढत अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून न निघणारी असल्याची भावना अनेक समर्थकांनी व्यक्त केली.
दरम्यान, अजितदादांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या एका कट्टर (attack)समर्थकाचाही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावचे रहिवासी सुदाम बोडके वय 63 हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.बुधवारी अजित पवार यांच्या विमान अपघातात निधनाची बातमी ऐकताच बोडके अचानक अस्वस्थ झाले. उपचार होण्याआधीच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. अजितदादांच्या जाण्याने एका समर्थकाचाही प्राण गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
नोकरीची संधी, Income Tax Department साठी काम करा, लगेच अर्ज करा
UPI पेमेंट फेल? तरीही कमाई होणार, जाणून घ्या हा फायद्याचा नियम
लँडिंगवेळी नासाच्या विमानाला आग; वैमानिक थोडक्यात बचावले, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल