मार्च महिना सुरू झाल्यानंतर बँकांच्या सुट्ट्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या महिन्यात विविध सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँका अनेक दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही पुढील काही दिवसांत बँकेत जाऊन कोणतेही महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाणून घेणे गरजेचे आहे. अन्यथा बँकेच्या शाखेत जाऊनही काम न होण्याची शक्यता आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार मार्च महिन्यात वेगवेगळ्या राज्यांमध्ये सण आणि विशेष दिवसांमुळे बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील काही शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत, (bank holiday) तर काही ठिकाणी सेवा सुरू राहतील. पुढील आठवड्यातील सुट्ट्यांमुळे अनेक ग्राहकांनी आपली बँकिंग कामे आधीच पूर्ण करण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच १७ मार्च रोजी शब-ए-कद्रनिमित्त जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद राहतील. मात्र देशातील इतर राज्यांमध्ये बँकिंग सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. त्यानंतर १९ मार्च रोजी गुढी पाडवा, उगादी आणि नवरात्र यांसारखे महत्त्वाचे सण साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, नागपूर, पणजी आणि विजयवाडा या शहरांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे.

दरम्यान, २० मार्च रोजी ईद उल फित्रमुळे कोची, त्रिवेंद्रम आणि विजयवाडा या शहरांमध्ये बँका बंद राहतील. त्यानंतर २१ मार्च रोजी रमजान ईद साजरी केली जाणार असल्याने देशातील बहुतांश भागात बँकांना सुट्टी असेल. (bank holiday) त्यानंतर २२ मार्च हा रविवार असल्यामुळे नियमित साप्ताहिक सुट्टी असणार आहे.

याशिवाय २६ मार्च रोजी श्री राम नवमीच्या निमित्ताने मिझोरम, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड तसेच मुंबई आणि नागपूरमध्ये बँका बंद राहतील. पुढील दिवशी म्हणजेच २७ मार्च रोजी मध्यप्रदेश, ओडिशा, सिक्किम, तेलंगणा, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये श्री राम नवमी निमित्त सुट्टी असेल.

२८ मार्च रोजी चौथा शनिवार असल्यामुळे देशभरातील बँकांना सुट्टी असणार आहे. तसेच महिन्याच्या शेवटी ३१ मार्च रोजी महावीर जयंतीनिमित्त गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

दरम्यान, या सर्व सुट्ट्यांदरम्यान बँकेच्या शाखा बंद असल्या तरी डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहतील. मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग आणि एटीएम सेवा २४ तास उपलब्ध असतील. (bank holiday) त्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे, बॅलन्स तपासणे किंवा इतर ऑनलाइन व्यवहार ग्राहक सहज करू शकतात. मात्र शाखेत जाऊन कराव्या लागणाऱ्या कामांसाठी ग्राहकांनी सुट्ट्यांचा विचार करूनच नियोजन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *