अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता जगभरातील बाजारांवर दिसू लागला आहे. या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम देशातील सोन्या-चांदीच्या बाजारावरही झाला असून दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहे. विशेषतः सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात याचा स्पष्ट परिणाम जाणवत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये अस्थिरता दिसून येत आहे. युद्धामुळे कच्च्या तेलासंबंधी निर्माण झालेला तणाव, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आयात-निर्यात प्रक्रियेत निर्माण झालेला अडथळा याचा परिणाम मौल्यवान धातूंच्या बाजारावर झाला आहे. (Gold) त्यामुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
युद्धाला सुरुवात झाल्यापासून गेल्या सुमारे १६ दिवसांत सराफ बाजारात सोन्याच्या दरात तब्बल १० हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवली गेली असून तब्बल ३४ हजार रुपयांनी दर खाली आले आहेत. (Gold) त्यामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे.
दरम्यान, आजच्या व्यवहारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या दरात सुमारे एक हजार रुपयांची घट झाली आहे. तर चांदीच्या दरात चार हजार रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले आहे.
सध्याच्या घडीला जीएसटीसह १० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना सुमारे १ लाख ६१ हजार १९५ रुपये मोजावे लागत आहेत. (Gold) तर एक किलो चांदीचा दर २ लाख ६३ हजार ६८० रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे आगामी काळातही सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज