भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्ष, माजी धावपटू आणि (President) राज्यसभा सदस्य पी.टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचं वयाच्या 67 व्या वर्षी निधन झालं आहे. शुक्रवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी त्यांना अचानक चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे क्रीडा आणि राजकीय विश्वात शोककळा पसरली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी.टी. उषा यांना दूरध्वनी करून सांत्वन व्यक्त केलं आहे. श्रीनिवासन हे उषा यांच्या क्रीडा आणि राजकीय प्रवासातील खंबीर आधारस्तंभ मानले जात होते. त्यांच्या निधनाने उषा कुटुंबावर मोठं दुःख कोसळलं असून, चाहत्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.

व्ही. श्रीनिवासन हे केंद्र सरकारचे माजी कर्मचारी होते. त्यांनी कस्टम (President)विभागात सेवा बजावली होती. 1991 मध्ये पी.टी. उषा आणि श्रीनिवासन यांचा विवाह झाला होता. त्यांचा उज्ज्वल नावाचा एक मुलगा आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांनी नेहमीच उषा यांच्या प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा दिला आणि त्यांच्या निर्णयांमध्ये मार्गदर्शन केलं.उषा स्कूल ऑफ ॲथलेटिक्सची स्थापना आणि त्याच्या यशस्वी वाटचालीमागेही श्रीनिवासन यांची प्रेरणा मोठी होती. खेळाडूंना घडवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक तरुण खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली.
श्रीनिवासन यांच्या निधनानंतर अनेक खेळाडू, क्रीडा संघटना आणि (President)राजकीय नेत्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. भारतीय ॲथलेटिक्सच्या ‘राणी’ला कायम प्रेरणा देणारा आणि पडद्यामागे राहून मोठं योगदान देणारा व्यक्ती म्हणून त्यांचं स्मरण केलं जात आहे.त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी होण्याची शक्यता असून, अनेक मान्यवर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या जाण्याने क्रीडा क्षेत्रातील एक शांत, पण महत्त्वाचा आधार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
नोकरीची संधी, Income Tax Department साठी काम करा, लगेच अर्ज करा
UPI पेमेंट फेल? तरीही कमाई होणार, जाणून घ्या हा फायद्याचा नियम
लँडिंगवेळी नासाच्या विमानाला आग; वैमानिक थोडक्यात बचावले, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल