अमेरिका आणि इस्रायल सतत इराणवर भीषण हल्ले करत आहे. यामुळे (attacks on Iran) इराणचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. इराणविरुद्ध अमेरिकेची लष्करी कारवाई पूर्ण ताकदीने सुरू आहे. आतापर्यंत इराणमधील 7000 पेक्षा जास्त लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. यात लष्करी आणि व्यावसायिक ठिकाणांचा समावेश आहे अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. तसेच इराणची अनेक जहाजे बुडवली असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ‘इराणी शासनाकडून निर्माण (attacks on Iran) झालेला धोका संपवण्यासाठी आम्ही गेल्या काही दिवसांत आमची मोहीम पूर्ण ताकदीने सुरू ठेवली आहे. आम्ही त्यांच्या सैन्यशक्तीला अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. या हल्ल्यांमुळे इराणकडून होणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणांमध्ये 90% घट झाली आहे, तर ड्रोन हल्ल्यांमध्ये 95% घट झाली आहे. कारण अमेरिकेने इराणमधील मिसाइल आणि ड्रोन तयार करणाऱ्या कारखान्यांनाही लक्ष्य केले.’
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे (attacks on Iran) बोलताना म्हटले की, ‘गेल्या काही आठवड्यांत इराणच्या 100 पेक्षा जास्त नौदल जहाजांना बुडवले किंवा नष्ट केले गेले आहे.’ अमेरिकन सैन्याने इराणच्या महत्त्वाच्या खार्ग बेटावर मोठा हल्ला केला, जिथे सर्व लष्करी ठिकाणे पूर्णपणे नष्ट करण्यात आली. यावर बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘आम्ही खार्ग बेटावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. मात्र तेथील तेल पाइपलाईन आणि तेल पायाभूत सुविधांना जाणूनबुजून लक्ष्य केले नाही.’
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर भीषण हल्ल्याचा इशारा दिला आहे. त्यांनी (attacks on Iran) म्हटले की, जर होर्मुजच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांच्या वाहतुकीला अडथळा आणला गेला तर अमेरिका इराणच्या तेल पायाभूत सुविधांनाही लक्ष्य करण्याचा विचार करू शकते. आम्हाला ते करायचे नाही, पण आम्ही ते करू शकतो. फक्त पाच मिनिटांत खात्मा होऊ शकतो, पण त्याची पुनर्बांधणी करायला खूप वेळ लागेल.’
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज