इराणसोबत सुरू असलेल्या (global supply) तणावपूर्ण परिस्थितीमुळे आणि Strait of Hormuz या महत्त्वाच्या सामुद्रधुनीवरील निर्बंधांमुळे जागतिक स्तरावर तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना आता इराणची परवानगी घेणे बंधनकारक झाले आहे, त्यामुळे अनेक देशांसमोर ऊर्जा सुरक्षेचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत भारताने आपल्या कूटनीतिक कौशल्याचा वापर करत काही जहाजांना सुरक्षित मार्ग काढून दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली (global supply) आहे. Shivalik LPG carrier हे भारतीय गॅस वाहू जहाज सुरक्षितपणे Mundra Port येथे पोहोचले आहे. सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत हॉर्मुज सामुद्रधुनी पार करणे अत्यंत कठीण मानले जात असताना हे जहाज यशस्वीपणे भारतात पोहोचणे ही महत्त्वाची बाब मानली जात आहे. हे जहाज कतारमधून निघाले होते आणि त्यामध्ये तब्बल 46,000 मेट्रिक टन एलपीजी साठवलेले आहे.

या एलपीजीचा वापर देशातील (global supply) घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी होणार आहे. एलपीजी लिक्विड स्वरूपात आयात केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर साठवणूक आणि वाहतूक करणे शक्य होते. 46,000 मेट्रिक टन म्हणजेच 4 कोटी 60 लाख किलोग्रॅम गॅस भारतात पोहोचला आहे. भारतात वापरला जाणारा घरगुती गॅस सिलेंडर साधारणपणे 14.2 किलोचा असतो. त्या प्रमाणे या गॅसमधून सुमारे 32 लाख 39 हजार सिलेंडर भरता येणार आहेत, जे लाखो घरांना दिलासा देणारे आहे.

सरकारने बंदर अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, सर्वप्रथम घरगुती वापरासाठी गॅस उतरवण्याला प्राधान्य द्यावे, त्यानंतरच औद्योगिक वापरासाठी वितरण करावे. सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, आकडेवारीनुसार भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा एलपीजी (global supply) ग्राहक देश आहे. मागील दशकात देशातील एलपीजीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2015-16 मध्ये 19.6 मिलियन मेट्रिक टन असलेली मागणी आता 2024-25 मध्ये 31.3 मिलियन मेट्रिक टनांवर पोहोचली आहे. याच काळात घरगुती गॅस ग्राहकांची संख्या 16.6 कोटींवरून वाढून 33 कोटींवर गेली आहे. त्यामुळे अशा संकटाच्या काळात पुरवठा सुरळीत ठेवणे हे सरकारपुढील मोठे आव्हान आहे, आणि शिवारिकसारख्या जहाजांच्या सुरक्षित आगमनामुळे देशाला मोठा दिलासा मिळत आहे.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *