उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात(together)मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता त्यांच्या पक्षाचं पुढे काय होणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कारभार कोणाच्या हाती जाणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी पक्षाचा कारभार नेमका कोण सांभाळणार? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

त्याचबरोबर राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचं असलेलं (together)उपमुख्यमंत्रीपद आता कोणाला दिलं जाणार? हा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. दरम्यान, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? हा मुद्दा सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून वेगळ्या झालेल्या या दोन राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात पवार कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि प्रमुख नेते एकत्र बसून सखोल चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आज किंवा उद्या पवार कुटुंबीय या विषयावर(together) अंतिम निर्णय घेऊ शकतात. यामध्ये पक्षाची पुढील वाटचाल, नेतृत्वाची जबाबदारी आणि राजकीय रणनीती यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेत शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबत अंतिम शब्द शरद पवार यांचाच असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असून, या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात
हेही वाचा :
नोकरीची संधी, Income Tax Department साठी काम करा, लगेच अर्ज करा
UPI पेमेंट फेल? तरीही कमाई होणार, जाणून घ्या हा फायद्याचा नियम
लँडिंगवेळी नासाच्या विमानाला आग; वैमानिक थोडक्यात बचावले, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल