लातूर शहरातून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना घडली आहे (casts) “मैं टिचर हूं, कुछ भी कर सकता हूं” अशी भाषा वापरत शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच पालकवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील ट्यूशन एरिया परिसरातील एका खासगी क्लासेसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

एक विद्यार्थिनी ट्युशनसाठी संबंधित शिक्षकाच्या क्लासमधील (casts) हॉलमध्ये आली. यावेळी शिक्षकाने हॉलमधील एकांताचा गैरफायदा घेत तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनीनी केला.आरोपी शिक्षकाने “मैं टिचर हूं, कुछ भी कर सकता हूं” अशी भाषा वापरत संबंधित पीडितेला धमकावलं. पीडित मुलीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला.
त्यानुसार आरोपी शिक्षकाच्या विरोधात पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस (casts) ठाण्यात तक्रार केली.या तक्रारीनुसार संबंधित शिक्षकाविरोधात शिवाजीनगर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर, पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
हेही वाचा :
खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?
सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार
