वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (post) दिल्ली कॅपिटल्सचा धु्व्वा उडवला. कर्णधार स्मृती मंधानाच्या नेतृत्वात आरसीबीने दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. 5 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीसमोर विजयासाठी 204 धावांचं आव्हान ठेवलं होतं. खरं तर हे आव्हान खूपच कठीण होतं. पण कर्णधार स्मृती मंधाने धैर्याने सामना करत विजयश्री खेचून आणला. स्मृतीने या सामन्यात 41 चेंडूत 87 धावांची खेळी केली. त्यामुळे या विजयासाठी तिला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. सर्व काही कर्णधार स्मृती आणि आरसीबी संघाच्या मनासारखं झालं. मग कुटुंबिय या विजयाच्या आनंदात मागे कसे राहतील. स्मृती मंधानाच्या आईने एक मीम इंस्टाग्रामवर रिपोस्ट केलं होतं. त्यामुळे स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यानंतर खूपच चर्चा होऊ लागल्याने अखेर स्मृतीच्या आईने पोस्ट डिलिट केली.

स्मृती मंधानाच्या आईल पोस्ट डिलिट केली खरी पण नेटकऱ्यांना त्यात (post)काय लिहिलं होतं ते माहिती आहे? त्यामुळे चर्चा काही थांबली नाही. या मीममध्ये मजेशीर अंदाजात दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व गोलंदाजांना पलाश मुच्छलच्या चेहऱ्यात दाखवलं होतं. स्मृतीने पलाश समजून गोलंदाजांवर राग काढला असा त्या मीम्समधून अर्थ निघत होता. सोशल मीडियावर स्मृतीच्या आईने केलेल्या पोस्टनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही जणांनी आश्चर्य व्यक्त केलं. तर काही जणांच्या मते चुकून झालं असावं मत नोंदवलं गेलं. पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्मिता मंधानाने ही पोस्ट डिलिट केली.
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न डिसेंबर 2025 मध्ये होणार आहे(post) मांडव सजला होता आणि सात फेरे घेणार तितक्यात ट्विस्ट आला. वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं बोललं गेलं. पण जसे दिवस उलटत गेले तसं या लग्नाबाबत वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळाल्या. अखेर पलाश मुच्छल आणि स्मृती मंधाना यांनी लग्न मोडल्याची घोषणा केली. त्यानंतर स्मृती मंधाना पुन्हा एकदा मैदानात परतली आणि क्रिकेटवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे.
हेही वाचा :
खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?
सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार