टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20i वर्ल्ड (wickets)कप 2026 स्पर्धेआधी 4 फेब्रुवारीला एकमेव सराव सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारताने गतउपविजेता दक्षिण आफ्रिकेवर 30 धावांनी मात केली. भारताने यासह मुख्य स्पर्धेआधी तयारी आणखी मजबूत केली. या स्पर्धेआधी सहभागी संघ सध्या सराव सामने खेळत आहेत. या स्पर्धेतील 12 व्या सराव सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. या सामन्यात रोहितच्या संघाने विजय मिळवला. रोहितच्या नेतृत्वातील विजयामुळे श्रेयसची खेळी व्यर्थ ठरली.

चेन्नईतील या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात (wickets)कॅनडा विरुद्ध नेपाळ आमनेसामने होते. नेपाळने या सामन्यात रोहित पौडेल याच्या नेतृत्वात कॅनडावर 6 विकेट्सने विजय मिळवला. नवनीत धालीवाल याच्या 41 आणि श्रेयस मोव्वा याने केलेल्या नाबाद 38 धावांच्या जोरावर कॅनडाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 161 रन्स केल्या. नेपाळने प्रत्युत्तरात 162 धावांचं आव्हान हे 12 बॉलआधी 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. नेपाळने 18 षटकांत 4 विकेट्स गमावून 162 धावा केल्या.

नेपाळची विजयी धावांचा पाठलाग करताना काही खास सुरुवात राहिली नाही. (wickets)कॅनडाने सलमीवीर फलंदाज कुशल भुर्टेल याला आऊट करत नेपाळला पहिला धक्का दिला. जसकरण सिंह याने कुशलला 12 रन्सवर एलबीडब्ल्यू केलं. त्यानंतर सुंदीप जोरा आणि आसिफ शेख या जोडीने निर्णायक भागीदारी करत नेपाळच्या विजयाचा पाया रचला. मात्र त्यानंतर सुंदीप आऊट झाला. सुंदीपने 30 बॉलमध्ये 40 रन्सचं योगदान दिलं. तर आसिफला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं. आसिफने 29 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. त्यानंतर लोकेश बाम 5 धावा करुन माघारी परतला.

लोकेश आऊट झाल्याने नेपाळचा (wickets)स्कोअर 16.1 ओव्हरमध्ये 3 आऊट 143 असा झाला. त्यानंतर दीपेंद्र सिंह आयरी आणि गुलशन झाला या जोडीने नेपाळला विजयापर्यंत पोहचवलं. दीपेंद्रने नाबाद 9 धावा केल्या. तर गुलशनने 31 धावांची निर्णायक खेळी केली. कॅनडासाठी जसकरण व्यतिरिक्त साद बिन जफर आणि अजयवीर हुंदल या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.दरम्यान नेपाळचा हा सराव सामन्यातील सलग आणि एकुण दुसरा विजय ठरला आहे. नेपाळ टीमने कॅनडाआधी यूएईवर 3 फेब्रुवारीला 7 विकेट्सने मात केली होती.

हेही वाचा :

पुण्यातून एकही ST बस मुंबईला जाणार नाही; सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पालघरसह ST च्या 139 बसेस रद्द

खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?

सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *