आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली असून यजमान (Sri Lanka) भारतासह श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इतर बलाढ्य संघांनी विजयी सलामी दिली आहे. दरम्यान, पाकिस्ताननेही आपली भूमिका बदलत १५ फेब्रुवारीला भारताविरुद्ध सामना खेळणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना बहुप्रतिक्षित हायव्होल्टेज लढत पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र, या उत्साहातच स्पर्धेत दुखापतींचे सावट गडद होताना दिसत आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे या १०व्या टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर पडला असून त्याच्या जागी अनुभवी मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूडही दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला होता. आता या यादीत श्रीलंकेचा आणखी एक महत्त्वाचा खेळाडू सामील झाला आहे.

श्रीलंका संघातील अनुभवी बॅटिंग ऑलराउंडर वानिंदू हसरंगा (Sri Lanka) याला दुखापतीमुळे वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतूनच माघार घ्यावी लागली आहे. ८ फेब्रुवारी रोजी आयर्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात त्याला मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली होती. विशेष म्हणजे, दुखापत असूनही हसरंगाने त्या सामन्यात तीन विकेट्स घेत श्रीलंकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
मात्र मंगळवारी, १० फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या एमआरआय स्कॅनमध्ये हसरंगाला गंभीर स्वरूपाची हॅमस्ट्रिंग दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उर्वरित संपूर्ण स्पर्धेत तो खेळू शकणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अद्याप याबाबत आयसीसी किंवा श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

वानिंदू हसरंगाच्या अनुपस्थितीत श्रीलंका (Sri Lanka) संघात ऑलराउंडर दुषण हेमंथाला संधी मिळण्याची शक्यता आहे. हसरंगाने आतापर्यंत श्रीलंकेसाठी ९५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून ९३ डावांत तब्बल १५४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो टी-२० वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, श्रीलंका संघ आपला पुढील सामना १२ फेब्रुवारी रोजी ओमानविरुद्ध खेळणार असून हा सामना पल्लेकेले स्टेडियममध्ये रंगणार आहे. हसरंगाच्या अनुपस्थितीत श्रीलंकेचा संघ या आव्हानाला कसा सामोरा जातो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *