बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यातील मुजफरा गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने (shocking incident) संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. गॅस सिलिंडरच्या किरकोळ वादातून एका तरुणाने आपल्या २१ वर्षीय गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत महिला लक्ष्मी देवी ही तब्बल नऊ महिन्यांची गर्भवती होती, त्यामुळे या घटनेने अधिकच संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. (shocking incident) घरातील गॅस सिलिंडर संपून दहा दिवस उलटले होते. त्यामुळे लक्ष्मीला चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे तिला मोठा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे तिने नवऱ्याकडे वारंवार गॅस सिलिंडर आणण्याची मागणी केली होती. मात्र, याच कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात नवरा राजाने लक्ष्मीवर बेदम मारहाण केली. तिच्या पोटात बाळ असल्याची जाणीव असूनही त्याने क्रूरपणे हल्ला सुरू ठेवला. या मारहाणीत लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर आरोपीने लक्ष्मीच्या (shocking incident) माहेरच्यांना फोन करून ती पडल्यामुळे मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. त्यानंतर सासरच्या लोकांनी मोबाईल बंद करून संपर्क तोडला. संशय आल्यामुळे लक्ष्मीचे कुटुंबीय तिच्या सासरी पोहोचले आणि त्यांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पतीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपीला दारूचे व्यसन असल्याचे आणि तो पत्नीवर नेहमी अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. या दाम्पत्याला अडीच वर्षांची एक मुलगीही आहे. या अमानुष घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी