अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांच्या नात्याबद्दल (truth) आज प्रत्येकाला माहिती आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरलं आणि चाहत्यांनी देखील त्यांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. लग्नापर्यंत दोघांचं नातं पोहोचलं, पण ते शक्य झालं नाही. सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला. ऐश्वर्या हिने सलमान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले… असं देखील सांगण्यात आलं. सलमान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. 2007 मध्ये ऐश्वर्या आणि आभिषेक यांनी लग्न केलं आणि 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. दरम्यान, आराध्या हिच्या जन्मानंतर सलमान याने आनंद व्यक्त केलेला.

सुनीता आहुजाच्या पॉडकास्टवर, पत्रकार हीना कुमावत यांनी आराध्याच्या (truth)जन्माबद्दल सलमान खानची प्रतिक्रिया आणि अभिनेत्याने काय म्हटलं होतं? याबद्दल मोठं वक्तव्य केलं. हीना म्हणाल्या, ‘त्याच दिवशी किंवा दोन-तीन दिवसांनंतर, सलमान खान एका मोबाईल कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून मुलाखती देत ​​होता. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या बाळाच्या जन्माबद्दलच्या प्रतिक्रियेसाठी माध्यमांचा त्याच्यावर दबाव होता.’हीना यांना देखील आराध्या हिच्या जन्मावर सलमान खान याची प्रतिक्रिया घेण्यास सांगितलं होतं. पण सलमान खान याला असा प्रश्न विचारणं त्यांना योग्य वाटलं नाही… यावर हीना म्हणाल्या, ‘ऐश्वर्या हिचं लग्न झालं… सलमान खानचं तिच्यासोबत कोणतंच नातं नाही… एक महिला म्हणून, मला त्याला असा प्रश्न विचारणं अयोग्य वाटले आणिमी नकार दिला.’

पुढे हिना म्हणाल्या, ‘प्रत्येक जण सलमानला एकच प्रश्न विचारत असताना मी स्पष्ट नकार दिला.(truth) पण काही दिवसांनंतर सोहेल खान याला देखील मुलगा झाला… त्यामुळे मी अभिनेत्याला विचारलं, ती आता काका झाला आहेस, कर तुला कसं वाटत आहे…’ यावर सलमान म्हणालेला, ‘फक्त काका नाही तर मामा देखील झालोय… माझी एकच प्रार्थना आहे, तिला मुले असावीत…’, असं देखील सलमान खान म्हणालेला.एवढंच नाही तर, 2011 मध्ये एका मुलाखतीत सलमान खान याने ऐश्वर्या हिच्या प्रेग्नेंसीवर मोठं वक्तव्य केलं होतं. ‘मी ऐश्वर्या – अभिषेक यांना शुभेच्छा देतो. ऐश्वर्या – अभिषेक यांना सात मुलं व्हावी, त्यांची पूर्ण क्रिकेट टीम असावी… अशी माझी इच्छा आहे…’ आराध्या हिच्याबद्दल देखील सलमान याने खास वक्तव्य केलं होतं. मी काका झालो आहे आणि मिस्टर अमिताभ बच्चन यांना आजोबा झाल्यामुळे शुभेच्छा देतो…’ असं देखील सलमान खान म्हणाला होता.

हेही वाचा :

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट

गुगलची डिजिटल स्ट्राइक! प्ले स्टोअरवरून ब्लॉक केले ‘हे’ विषारी अ‍ॅप्स; जर तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर, लगेच करा डिलीट

शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *