अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा पूर्व पती संजय कपूर यांच्या तब्बल 30 हजार (wealth) कोटी रुपयांच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या वादात आता दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाची भूमिका घेतली आहे. कुटुंबीयांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने सर्व पक्षांना परस्पर सहमतीने तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे.उद्योगपती संजय कपूर यांचे गेल्या वर्षी लंडनमध्ये पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. ते सोना कॉमस्टार कंपनीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या संपत्तीचे मूल्य सुमारे 30 हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या निधनानंतर ही मोठी मालमत्ता कोणाच्या वाट्याला जाणार, यावरून कुटुंबात तीव्र वाद निर्माण झाला आहे.

या वादात संजय कपूर यांची आई राणी कपूर , त्यांची पूर्व पत्नी करिश्मा कपूर, (wealth) दोन्ही मुलं आणि तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर हे सर्व पक्ष आमने-सामने आले आहेत. संजय आणि करिश्मा यांचा 2016 मध्ये घटस्फोट झाला होता, तर 2017 मध्ये संजयने मॉडेल प्रिया सचदेवशी विवाह केला होता. संजयच्या निधनानंतर करिश्माने आपल्या दोन मुलांच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत प्रियावर काही गंभीर आरोप केले होते.प्रिया सचदेव कपूर यांनी न्यायालयात असा दावा केला की संजय कपूर यांनी 2025 मध्ये केलेल्या मृत्यूपत्राद्वारे त्यांची संपूर्ण वैयक्तिक संपत्ती तिच्या नावावर केली आहे. मात्र, करिश्मा कपूर यांच्या मुलांनी आणि संजय कपूर यांच्या आई राणी कपूर यांनी या मृत्यूपत्राला फसवे असल्याचे सांगत त्याला न्यायालयात आव्हान दिले आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांनी हा वाद (wealth) संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत दु:खद असल्याचे नमूद केले. देवाने दिलेली इतकी मोठी संपत्ती अंतर्गत कलहामुळे वाया घालवण्यापेक्षा सर्वांनी सामंजस्याने वाटून घ्यावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, प्रिया सचदेव यांच्या वकिलांना न्यायालयाने मध्यस्थीसाठी पुढाकार घेण्याचा सल्ला दिला. न्यायालयाने सर्व पक्षकारांच्या वकिलांना आपल्या क्लायंटशी चर्चा करून त्यांना मध्यस्थीसाठी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, संजय कपूर यांच्या आई राणी कपूर यांनी सुमारे 28 हजार कोटी रुपयांचा अंतरिम डिव्हिडंड प्रिया कपूरला देण्यावर स्थगिती देण्याची मागणी केली आहे, तर प्रियाने ही याचिका फेटाळण्याची विनंती केली आहे. या दोन्ही अर्जांवर नोटीस बजावण्यात आली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 मार्च रोजी होणार आहे.

हेही वाचा :

T20 World Cup 2026 : दुखापतीला आणखी 1 विकेट, मॅचविनर खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेतून आऊट

दमदार बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy F70e 5G हा स्मार्टफोन स्वस्तात झाला लाँच, जाणून घ्या किंमत

Jeffrey Epstein Files : जेफ्री एपस्टिनच्या रेड रुममध्ये काय घडायचं ? जगातील सर्वात सुंदर तरुणी…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *