दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना (security) आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे दोघे 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूर येथे विवाहबंधनात अडकणार आहेत.लग्नासाठी निवडलेले ठिकाण अत्यंत खास आणि गोपनीय ठेवण्यात आले आहे. हा विवाह सोहळा ITC Mementos Udaipur येथे पार पडणार आहे. उदयपूरपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर अरावली पर्वतरांगांमध्ये वसलेले हे आलिशान रिसॉर्ट पूर्णपणे खासगी आणि सुरक्षित आहे. येथे 117 प्रायव्हेट व्हिला, नदी-तलाव, खासगी हेलिपॅड आणि संपूर्ण टेकडीवर पसरलेली मालमत्ता आहे. त्यामुळे गोपनीयता आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे ठिकाण आदर्श मानले जाते.

हा विवाह सोहळा तीन दिवस चालणार असून सुमारे 100 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.(security) यामध्ये दोन्ही कुटुंबीय आणि अगदी जवळचे मित्रपरिवार सहभागी होणार आहेत. अंदाजे 50 जण कपलसोबत कमर्शियल फ्लाइटने उदयपूरला पोहोचणार असल्याचे सांगितले जात आहे.उदयपूर विमानतळावर आधीच कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. काही सेलिब्रिटी आणि व्हीआयपी पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र मोठ्या प्रमाणात बॉलिवूड किंवा साऊथ इंडस्ट्रीतील नामांकित कलाकार उपस्थित राहणार नसल्याचे समजते. तेलंगणातील काही नेते आणि काही दिग्दर्शक या सोहळ्याला उपस्थित राहू शकतात.

रश्मिका आणि विजय यांच्या चाहत्यांनी त्यांच्या नावांचा (security) संगम करून ‘VIROSH’ हे नाव वर्षांपूर्वी दिले होते. आता या दोघांनी आपल्या लग्नाला ‘द वेडिंग ऑफ VIROSH’ असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या भावनिक संदेशात त्यांनी चाहत्यांचे आभार मानत लिहिले की, ‘तुम्ही आम्हाला प्रेमाने ‘VIROSH’ हे नाव दिलंत. त्यामुळे आमच्या लग्नालाही हेच नाव देत आहोत. तुम्ही नेहमी आमच्यासोबत आहात.’लग्न पूर्णपणे खासगी ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थान पोलिसांसोबत समन्वय साधून संपूर्ण रिसॉर्ट परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ‘नो फोन, नो कॅमेरा’ पॉलिसी कडकपणे लागू केली जाणार असून कोणतीही माहिती बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. अलीकडेच रश्मिका आणि विजय उदयपूरकडे रवाना होताना विमानतळावर एकत्र दिसले होते. फॉर्मल लूकमध्ये ते दोघेही अतिशय आनंदी आणि उत्साही दिसत होते.

हेही वाचा :

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट

गुगलची डिजिटल स्ट्राइक! प्ले स्टोअरवरून ब्लॉक केले ‘हे’ विषारी अ‍ॅप्स; जर तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर, लगेच करा डिलीट

शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *