माणसाच्या आयुष्यात नेहमी चढउतार येतात. कधी सुखाचे क्षण असतात तर कधी दु:खाचे क्षण असतात.(solved) त्या काळात तुम्ही कसे वागता? ती परिस्थिती कशी हाताळता यावर सर्व काही अवलंबून असतं. महाराष्ट्रातही अशाच दोन घटना घडल्या आहेत. राज्यात सध्या इयत्ता बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेदरम्यान एका विद्यार्थीनीला वर्गातच चक्कर आली. तिला लगेच रुग्णालयात अॅडमिट केलं. तिच्यावर उपचार सुरू केले. बरं वाटायला लागल्यावर तिने रुग्णालयात बसून पेपर सोडवला. दुसरी घटना तर अत्यंत हृदयद्रावक आहे. वाचून कुणाच्याही मनात कालवाकालव झाल्याशिवाय राहणार नाही. काय आहे ही घटना?

अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यात बारावीच्या परीक्षेदरम्यान (solved) एक धक्कादायक पण तितकीच दिलासादायक घटना समोर आली आहे. हाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि च्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या अमरावती विभागीय मंडळांतर्गत सुरू असलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र एचएससी परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीची अचानक प्रकृती बिघडली होती. 21 फेब्रुवारी रोजी गणिताची परीक्षा सुरू असताना मूर्तीजापूर तालुक्यातील हरिपूर येथील अनंतराव देशमुख ज्युनिअर कॉलेज येथील श्रेया गुणवंत देशमुख हिची सकाळी सुमारे 10:50 वाजता प्रकृती अचानक खालावली आणि चक्कर येऊन ती बेशुद्ध पडल्याने परीक्षा केंद्रातील कर्मचारी आणि उपस्थित पालकांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर या घटनेची माहिती केंद्र संचालकांनी तत्काळ वरिष्ठांना कळवली.
विभागीय अध्यक्ष संदीप सांगवे यांनी तातडीने मार्गदर्शन करत त्यानुसार सकाळी 11:40 वाजता संबंधित अधिकाऱ्यांनी महाजन रुग्णालयात भेट देत विद्यार्थिनीच्या प्रकृतीची विचारपूस केली. तिची प्रकृती स्थिर झाल्यानंतर विद्यार्थिनीने परीक्षा देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर मूर्तीजापूर येथून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका रुग्णालयात पोहोचवण्यात आली. शिक्षकांच्या उपस्थितीत आणि नियमांचे पालन करत विद्यार्थिनीने रुग्णालयातच गणिताचा पेपर पूर्ण केला.
दुसरी घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. भंडारा येथील विद्यार्थ्याची आई अनेक दिवसापासून दुर्धन आजाराने आजारी होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या आदल्याच रात्री काळाने सुखरामची परीक्षा घेतली. त्याच्या आईचा मृत्यू झाला. परीक्षेच्या तणावात आई पाठराखण करत असते. मात्र आता त्या आईचेच छत्र हरपल्याने विद्यार्थ्याचे अश्रू अनावर झाले. मात्र आईचे स्वप्न पूर्व करावे या उद्देशातून सुखराम निदराम भुसारी या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्याने स्वतःला सावरले आणि धैर्य दाखवत करिअरमधील पहिला पेपर दिला. सुखराम निदराम भुसारी असे विद्यार्थ्याचे नाव असून तो भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल पालांदूर येथील विद्यार्थी आहे. आईचे छत्र हरवून गेल्याने विद्यार्थ्याने धैर्य न सोडता शुक्रवारी जड अंतःकरणाने मराठीचा पेपर दिला. विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक केले जात असून शिक्षणप्रती असलेली तडमड दाखविली आहे.
दरम्यान, नागपुरात बारावी पेपरफुटी प्रकरणी ट्युशन संचालकासह दोघांना (solved)अटक करण्यात आली आहे. निशिकांत मून मानकापूर फरहान अख्तर कामगारनगर अशी त्यांची नावे आहेत. निशिकांत मून हा शिकवणी वर्ग चालवत होता, तर फरहान हा तिथे शिक्षक म्हणून काम करत होता. सिव्हिल लाइन्स येथील सेंट उर्मूला हायस्कूल परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. रसायनशास्त्राच्या पेपरदरम्यान विद्यार्थिनीच्या झडतीत स्मार्टफोन सापडला. व्हॉट्सअॅप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका आणि उत्तरे अपलोड होत होती. ‘एक्सआयआय’ नावाच्या 21 सदस्यीय ग्रुपवर पेपर फोडण्यात करण्यात आला होता. मोबाईलमध्ये 16 फेब्रुवारीचा भौतिकशास्त्र पेपरही या ग्रुपवर आढळला. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक तपासातून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा :
आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट
शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार