राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होत असून अवकाळी (rains) पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढवली आहे. फेब्रुवारी महिना संपत आला तरीही पावसाचा लपंडाव सुरूच आहे. सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी अचानक पाऊस अशी विचित्र परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा जारी केला आहे.काल राज्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून पुढील दोन दिवस हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाकडून विदर्भ आणि मराठवाडा (rains) विभागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कर्नाटकापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.धाराशिव, लातूर , नांदेड , सोलापूर हिंगोली, गडचिरोली आणि चंद्रपूर या सात जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा विशेष इशारा देण्यात आला आहे. या भागांत अचानक वाऱ्याचा वेग वाढून मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील इतर भागांमध्येही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असल्याचे चित्र आहे. (rains) निफाड येथे राज्यातील नीचांकी 12.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर ब्रह्मपुरी येथे उच्चांकी 36.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. एकाच दिवशी थंडी, ऊन आणि पाऊस अनुभवावा लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, बीड जिल्ह्यासह माजलगाव आणि परळी तालुक्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. ज्वारी, हरभरा, गहू या पिकांसोबतच फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून नुकसानभरपाईची मागणी जोर धरत आहे. पुढील दोन दिवस हवामानाची स्थिती अशीच राहिल्यास शेतीला आणखी फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं
जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या