सोशल मीडियावर ‘प्रसिका’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय कंटेंट क्रिएटर (reopened) कपल प्रसाद आणि दीपिका वेदपाठक यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट्स सस्पेंड झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. कोणतीही पूर्वसूचना किंवा स्पष्ट कारण न देता त्यांची एक नव्हे, तर तब्बल चार अकाऊंट्स अचानक बंद करण्यात आली होती. या घटनेमुळे त्यांच्या लाखो फॉलोअर्समध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणात आता महत्त्वाची घडामोड झाली आहे. (reopened) दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्यांचे prasika_official हे मुख्य इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आले आहे. दीपिकाने स्वतः इंस्टाग्रामवर अधिकृत मेलचा स्क्रीनशॉट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली. या मेलमध्ये इंस्टाग्रामकडून अकाऊंटची तपासणी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले असून, संबंधित अॅक्टिव्हिटी वापर अटींनुसार योग्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरीही व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र, चारपैकी केवळ एकच अकाऊंट सध्या अॅक्टिव्ह झाले असून उर्वरित तीन (reopened)अकाऊंट्स अजूनही डिअॅक्टिव्ह असल्याचे प्रसाद आणि दीपिकाने सांगितले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेले नाही.अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर प्रसादने एक व्हिडिओ शेअर करत इंस्टाग्राम आणि मेटाकडे यामागील कारण स्पष्ट करण्याची मागणी केली होती. त्यांनी अकाऊंट पुन्हा सुरू करण्यासाठी सार्वजनिकरित्या विनंतीही केली होती. मात्र अनेक दिवस कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दोघांनी मेटाच्या मुंबईतील बीकेसी कार्यालयाला भेट दिली. तरीही त्यांना रिसेप्शनपलीकडे जाण्याची परवानगी मिळाली नाही, अशी माहिती त्यांनी दिली होती.
प्रसाद आणि दीपिका वेदपाठक हे गेली अनेक वर्षे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना व्यवसायात प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. ‘ZIDD’ या नावाने त्यांनी स्वतःचा टी-शर्ट ब्रँड बाजारात आणला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या जिद्दीचा आणि चिकाटीचा संदेश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.या संपूर्ण प्रकरणातून सोशल मीडियावरील अनिश्चितता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील धोरणांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मात्र, आलेल्या संकटाचा सामना करत प्रसिका कपलने पुन्हा एकदा स्वतःची ‘जिद्द’ सिद्ध केली आहे.
हेही वाचा :
नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं
जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या