एमटीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘स्प्लिट्सव्हिला 7’मधून घराघरात पोहोचलेला (Actor) अभिनेता MTV Splitsvilla 7 फेम मयंक पवार याचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्याची बातमी समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही दु:खद माहिती देण्यात आली असून मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

मयंक पवार हा ‘स्प्लिट्सव्हिला 7’मधील सर्वात चर्चित आणि लोकप्रिय (Actor) स्पर्धकांपैकी एक होता. शोदरम्यान त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि आक्रमक स्वभावामुळे तो काही वेळा वादातही सापडला होता. मात्र त्याचबरोबर त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले होते. त्याच्या अचानक निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मयंकच्या अकाउंटवरून शेअर करण्यात (Actor) आलेल्या पोस्टमध्ये त्याला “एक भाऊ, एक चॅम्पियन, एक मार्गदर्शक आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान” असे संबोधण्यात आले आहे. 25 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत राणा प्रताप बाग येथील संगम पार्कमधील वाल्मिकी मंदिर येथे शोकसभा आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या शोकसभेला त्याचे चाहते आणि जवळचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
‘स्प्लिट्सव्हिला 7’मधील एक भावुक क्षण सध्या सोशल (Actor) मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. शोची होस्ट Sunny Leone एका टास्कदरम्यान मयंकसाठी भावुक झाल्याचा व्हिडिओ चाहत्यांमध्ये चर्चेत आला आहे. त्या क्षणी तिच्या डोळ्यात आलेले अश्रू आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत.
मयंकच्या निधनानंतर सोशल मीडियावर “Gone Too Soon” आणि “RIP मयंक” असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. अनेक चाहत्यांनी त्याच्या अचानक जाण्याला हृदयद्रावक म्हटले असून त्याच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. मनोरंजन क्षेत्राने एक उत्साही आणि जिद्दी कलाकार गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं
जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या