तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी (new bike) महत्त्वाची ठरू शकते. ब्रिटिश ब्रँड Norton Motorcycles लवकरच आपली नवीन अ‍ॅडव्हेंचर बाईक Norton Atlas ADV भारतीय बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहे. अ‍ॅडव्हेंचर सेगमेंटमध्ये वाढती मागणी पाहता कंपनीकडून ही मोठी चाल मानली जात आहे.

अ‍ॅडव्हेंचर बाईक्सची क्रेझ भारतात झपाट्याने (new bike) वाढत आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी, ऑफ-रोडिंगसाठी आणि दमदार लूकसाठी ग्राहक या सेगमेंटकडे आकर्षित होत आहेत. याच पार्श्वभूमीवर नॉर्टनची अ‍ॅटलास एडीव्ही चर्चेत आली आहे. कंपनी जून-जुलैदरम्यान ही बाईक लाँच करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अलीकडेच टेस्टिंगदरम्यान या बाईकचे दर्शन घडले असून काही महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत.

गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय मोटर शोमध्ये या बाईकची स्टँडर्ड आणि GT अशी दोन मॉडेल्स (new bike) सादर करण्यात आली होती. मात्र भारतात टेस्टिंगदरम्यान दिसलेल्या मॉडेलमध्ये काही बदल जाणवले. भारतीय रस्त्यांच्या परिस्थितीला लक्षात घेऊन 19 इंच फ्रंट आणि 17 इंच रिअर अलॉय व्हील्स देण्यात आल्याचे दिसते. यामुळे ही आवृत्ती खास भारतीय बाजारासाठी तयार करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सस्पेंशन (new bike)सेटअपमध्ये पुढील बाजूस अप-साइड डाउन (USD) फोर्क्स देण्यात आले आहेत, तर खडबडीत रस्त्यांवर अधिक चांगली पकड मिळावी यासाठी ब्लॉक पॅटर्न टायर्स वापरण्यात आले आहेत. बाईकचा एकूण पोत मजबूत आणि दमदार वाटतो. मोठी फेअरिंग, उंच विंडस्क्रीन, ड्युअल-पॉड हेडलाइट आणि आधुनिक एलईडी डीआरएलमुळे तिला खऱ्या अर्थाने अ‍ॅडव्हेंचर बाईकचा लूक मिळतो.इंजिनबाबत बोलायचे झाले तर या बाईकमध्ये 585 सीसीचे पॅरलल ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात येण्याची शक्यता आहे. हे इंजिन सुमारे 65 ते 70 एचपी पॉवर निर्माण करू शकते आणि ते 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले असेल. त्यामुळे ही बाईक शहरातील वापरासोबतच हायवे आणि ऑफ-रोडिंगसाठीही सक्षम ठरेल.

फीचर्सच्या बाबतीतही अ‍ॅटलास एडीव्ही स्मार्ट ठरणार आहे. 8 इंचांची मोठी (new bike)टीएफटी स्क्रीन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि विविध राइडिंग मोड्ससारखी आधुनिक वैशिष्ट्ये यात दिली जाऊ शकतात. त्यामुळे लांब प्रवास आणि साहसी सफरी आवडणाऱ्यांसाठी ही बाईक आकर्षक पर्याय ठरू शकते.विशेष म्हणजे, TVS Motor Company च्या पाठबळामुळे भारतात सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट्सची उपलब्धता सुलभ होण्याची अपेक्षा आहे. काही प्रीमियम फीचर्स चाचणी मॉडेलमध्ये दिसली नसली तरी कंपनी ही बाईक स्पर्धात्मक आणि परवडणाऱ्या किंमतीत सादर करण्याचा प्रयत्न करेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे अ‍ॅडव्हेंचर सेगमेंटमध्ये या नव्या बाईकची एंट्री किती प्रभावी ठरते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा :

नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं

जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *