धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे गावावर दु:खाचा डोंगर (sorrow) कोसळला आहे. लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. धनु बाजीराव माळचे या आदिवासी समाजातील तरुणाचे 25 फेब्रुवारी रोजी लग्न होणार होते. घरात लग्नाची लगबग सुरू होती, नातेवाईकांची ये-जा वाढली होती आणि आनंदाचे वातावरण होते. मात्र नियतीने वेगळाच डाव साधला.

लग्नाच्या तयारीदरम्यान (sorrow) धनु घराची साफसफाई करत होता. याचवेळी त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो खाली कोसळला. कुटुंबीयांनी तात्काळ त्याला साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. ही बातमी कळताच आनंदाने गजबजलेले घर क्षणात शोकाकुल झाले. लग्नाच्या मंडपाऐवजी घरासमोर अंत्यविधीची तयारी सुरू झाली आणि सर्वत्र हळहळ व्यक्त होऊ लागली.
धनु हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. कष्टाळू, प्रामाणिक आणि (sorrow) सर्वांमध्ये मिसळून राहणारा म्हणून त्याची ओळख होती. क्रिकेटची विशेष आवड असलेला धनु गावातील तरुणांमध्ये लोकप्रिय होता. त्याच्या अचानक जाण्याने आई-वडिलांचा आधारच हरपला असून संपूर्ण कासारे गावात शोककळा पसरली आहे. दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याचा अंत्यविधी पार पडला. आनंदाच्या क्षणांचे रूपांतर दु:खात झाल्याने गावकरी सुन्न झाले आहेत.
हेही वाचा :
नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं
जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या