मुंबईतून एक मोठी घडामोड समोर आली असून उद्योगपती अनिल अंबानी यांच्या (Enforcement Directorate) मुंबईतील ‘Abode’ या आलिशान निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालयाकडून (Enforcement Directorate) तात्पुरती जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाली हिल परिसरातील या 17 मजली इमारतीची अंदाजे किंमत 3,716 कोटी रुपये इतकी असून ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई कथित बँक फसवणुकीशी (Enforcement Directorate) संबंधित प्रकरणाच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. हे प्रकरण Reliance Communications (आरकॉम) या कंपनीशी निगडीत असून कंपनीच्या कर्ज व्यवहारांबाबत चौकशी सुरू आहे. याआधीही अनिल अंबानी आणि त्यांच्या उद्योग समूहातील विविध कंपन्यांविरोधात ईडीने मोठ्या प्रमाणावर जप्तीची कारवाई केली असून एकूण जप्त मालमत्तेची रक्कम 15 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन (Enforcement Directorate) पातळीवरही महत्त्वाची घडामोड झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाने यासंबंधित एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला अंतरिम आदेश रद्द केला. रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या बँक खात्यांना ‘फसवे’ म्हणून वर्गीकृत करण्याच्या प्रक्रियेवर यापूर्वी स्थगिती देण्यात आली होती; मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे संबंधित तपास आणि कारवाईला मार्ग मोकळा झाला आहे.
पाली हिलमधील ‘Abode’ ही इमारत अनिल अंबानी यांचे प्रमुख (Enforcement Directorate) निवासस्थान मानली जाते. तात्पुरत्या जप्तीच्या आदेशामुळे मालमत्तेच्या व्यवहारांवर निर्बंध लागू होतात आणि तपास पूर्ण होईपर्यंत ती विक्री अथवा हस्तांतरण करता येत नाही. ही कारवाई जरी तात्पुरती असली तरी आर्थिक आणि कायदेशीर दृष्ट्या अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणेकडून पुढील कारवाईबाबत लवकरच अधिकृत माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
पहिलं Long Distance Relationship आता Silent Love! काय आहे हा नवा ट्रेंड ?
‘धुरंधर 2’मध्ये ‘बडे साहब’ कोण? अखेर पडदा उघडला; या अभिनेत्याचे नाव समोर येताच…