केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट समोर आणली आहे.(regarding)आठव्या वेतन आयोगासाठी सरकार अॅक्टिव्ह मोडमध्ये आलं आहे. आठव्या वेतन आयोगासाठी अधिकृत वेबसाइट 8cpc.gov.in लाँच केली आहे. या वेबसाइटवरुन कर्मचाऱ्यांचे प्रक्रियादेखील सुरु झाली आहे.आयोगाने स्पष्ट केले आहे की, या सर्व सूचना फक्त MyGov प्लॅटफॉर्मवर स्विकारल्या जातील. ईमेल, पेपर आणि पीडीएफद्वारे कोणत्याही सूचना स्विकारल्या जाणार नाहीत.ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे.

कर्मचाऱ्यांना प्रश्नावली हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत उपलब्ध आहेत.(regarding) ज्यामुळे अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांची मते मांडता येणार आहेत. यासाठी १६ मार्चपर्यंतची संधी आहे. त्याआधी कर्मचाऱ्यांनी आपल्या सूचना द्यायच्या आहेत.त्यानंतर सूचना स्विकारल्या जाणार नाहीत.वेतन आयोगाच्या म्हणण्यांनुसार, ही प्रक्रिया पारदर्शक असणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सूचना गोपनीय ठेवल्या जातील. त्यामुळे निकाल हा एकत्रित आकडेवारीनंतर सादर केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सूचना लक्षात घेऊन पुढील शिफारसी तयार करण्यास मदत होणार आहे.

२०२५ च्या शेवटी सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन केला. केंद्र सरकारी कर्मचारी (regarding)आणि पेन्शनधारकांचे वेतन, भत्ते आणि पेन्शनचा आढावा घेण्याचे काम आयोगाकडे आहे. याचा अहवाल तयार करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी आहे. आता ही वेबसाइट सुरु झाली आहे. या वेबसाइटवरुन कर्मचाऱ्यांच्या सूचना घेतल्या जातील. या सूचनांच्याआधारे पुढील शिफारसी तयार केल्या जाणार आहेत.

हेही वाचा :

T20 World Cup 2026 : दुखापतीला आणखी 1 विकेट, मॅचविनर खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेतून आऊट

दमदार बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy F70e 5G हा स्मार्टफोन स्वस्तात झाला लाँच, जाणून घ्या किंमत

Jeffrey Epstein Files : जेफ्री एपस्टिनच्या रेड रुममध्ये काय घडायचं ? जगातील सर्वात सुंदर तरुणी…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *