धुरंधर 2′ आणि ‘टॉक्सिक’ या दोन्ही चित्रपटांची टक्कर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 19 मार्च 2026 रोजी हे दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. (‘Dhurandhar 2’) अशातच दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

आपल्या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी यशच्या ‘टॉक्सिक’ आणि रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस टक्करविषयी आपलं मत मांडलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणावाशी त्याचा संबंध जोडून अजब पोस्ट लिहिली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून ते ‘टॉक्सिक’ आणि ‘धुरंधर 2’ या चित्रपटांच्या होणाऱ्या टक्करबाबत सतत काही ना काही पोस्ट लिहित आहेत. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ आणि ‘केजीएफ’ फेम यशचा ‘टॉक्सिक’ हे दोन्ही चित्रपट येत्या 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत.

राम गोपाल वर्मा यांनी ‘टॉक्सिक’ आणि ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांच्या टक्करला थेट युद्धाशी जोडलं आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांदरम्यान त्यांनी असं ट्विट केलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.(‘Dhurandhar 2’) त्यांच्या मते या दोन्ही परिस्थितींमध्ये परिणाम विनाशकारी असू शकतात, परंतु या विनाशाचं स्वरुप वेगळं असेल. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘मी टॉक्सिक आणि धुरंधर 2 यांच्यातील संघर्षाची जितकी आतुरतेने वाट पाहत होतो, तितकीच अमेरिका-इराण संघर्षाचीही वाट पाहत होतो. एकात (युद्धात) लोकांचा जीव जाईल, तर दुसऱ्यात पैशांचं नुकसान होईल.’

हे दोन्ही बिग बजेट चित्रपट असून दोन्हींवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. (‘Dhurandhar 2’) त्यामुळे अर्थातच जेव्हा बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांची टक्कर होईल, तेव्हा कोणत्या तरी एका चित्रपटाचं मोठं नुकसान होणार आहे, किंवा दोन्हींचा नफा मर्यादित होईल. ‘धुरंधर 2’ हा रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने 1000 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. दुसरीकडे यशच्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटात कियारा अडवाणी, तारा सुतारिया, अक्षय ओबेरॉय, रुक्मिणी वसंत, नयनतारा यांच्या भूमिका आहेत. 2026 या वर्षातील ही बॉक्स ऑफिसवरील मोठी टक्कर मानली जात आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *