नंदुरबार जिल्ह्यातील रावलापाणी शहीद स्थळ येथे शहीद दिनानिमित्त हजारो भाविकांनी हजेरी लावली असताना त्याच मार्गावरील तळोदा तालुक्यातील हातबारीपाडा (pot of water) येथे तीव्र पाणीटंचाईमुळे स्थानिक नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सुमारे २५० लोकवस्ती असलेल्या या पाड्यात कोणतीही सक्षम पाणीपुरवठा योजना नसल्याने ग्रामस्थांना दररोज पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

येथील एकमेव हातपंप गेल्या काही दिवसांपासून बंद पडलेला असून त्याची दुरुस्ती न झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.(pot of water) परिणामी महिलांना आणि लहान मुलांना निझरा नदीच्या पात्रात झिरा करून पाणी काढावे लागत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असताना नदीपात्रातील पाण्याचाही साठा कमी होत चालल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. शहीद दिनाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक स्थळाला भेट देणाऱ्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत या भागातील मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर युवा क्रांती नंदुरबार संघटना यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. हातबारीपाड्यासह या मार्गावरील सर्व पाड्यांत तातडीने बोरवेल खोदकाम करावे किंवा कायमस्वरूपी जलवाहिनी योजना राबवावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.(pot of water) मागण्या तातडीने मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अ‍ॅड. रुपसिंग वसावे आणि पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन या गंभीर प्रश्नावर कोणती पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *