पश्चिम आशियातील तणाव दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून इराण (West Asia) आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने आंतरराष्ट्रीय राजकारणाला नवे वळण दिले आहे. इस्रायलच्या हल्ल्यांना इराणकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात असून आखाती प्रदेशातील काही अमेरिकन लष्करी तळांवरही हल्ले झाल्याच्या वृत्तांमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकाने कठोर भूमिका घेतली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला (West Asia) थेट इशारा देत शस्त्रसंधी न केल्यास अभूतपूर्व कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या विधानानंतर जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या संघर्षात आता चीननेही स्पष्ट भूमिका मांडली आहे. चीनने इराणच्या सार्वभौमत्वावर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याचा तीव्र निषेध करत मध्यपूर्वेत तात्काळ युद्धविरामाची मागणी केली आहे.
चीनने आपल्या निवेदनात म्हटले (West Asia) आहे की, कोणत्याही देशाच्या सर्वोच्च नेतृत्वावर हल्ला करणे हे संयुक्त राष्ट्रांच्या तत्त्वांच्या विरोधात आहे आणि त्यामुळे प्रादेशिक स्थैर्य धोक्यात येऊ शकते. तसेच इराणने चीनकडून क्षेपणास्त्रांची खरेदी केल्याच्या दाव्यालाही चीनने फेटाळून लावले असून असा कोणताही व्यवहार झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. चीनची ही भूमिका केवळ राजनैतिक नसून आर्थिक आणि सामरिक संतुलन साधण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिली जात आहे.
मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त (West Asia) करत आहेत. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विशेषतः भारतासारख्या देशांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. भारत हा संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि कुवैत यांसारख्या देशांकडून मोठ्या प्रमाणात इंधन आयात करतो. त्यामुळे युद्ध लांबले तर इंधन दरवाढ आणि महागाईचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चीनच्या हस्तक्षेपानंतर पुढील काही दिवसांत आंतरराष्ट्रीय (West Asia) पातळीवर राजनैतिक हालचाली वेगाने वाढण्याची चिन्हे आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या पातळीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, संघर्ष आणखी तीव्र झाला तर तो केवळ दोन देशांपुरता मर्यादित न राहता व्यापक स्वरूप धारण करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जागतिक समुदायाचे लक्ष आता मध्यपूर्वेकडे लागले असून शांततेच्या दिशेने ठोस पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!