राज्यातील पुढील काही महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. अशा वेळी शिवसेना शिंदे गटाला(Group) मोठा धक्का बसला आहे.शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, जे आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आहेत, यांनी गट सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि राजकारणामुळे कंटाळून त्यांनी पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली.

दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवाजी सावंत, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि अन्य पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार आहे.सोलापूर महानगरपालिका, पंचायत समिती आणि झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकद जिल्ह्यात वाढणार आहे.
यामुळे शिवसेना शिंदे गटात(Group) अंतर्गत नाराजी आणखी उफाळून आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना, भाजपमध्ये जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत उपरोधिक भाष्य केले – “दिल्या घरी सुखी राहा.”

त्यांनी पुढे सांगितले की, शिवाजी सावंत आणि इतरांचा भाजप प्रवेश हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील या घडामोडी एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
हेही वाचा :
टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर
नवीन Harley-Davidson Street Bob भारतात लाँच
ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार आदेश बांदेकरांची सून?