राज्यातील साखर उद्योग सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात असून, अनेक साखर कारखाने कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. अशा परिस्थितीत एका साखर कारखानदाराने “आता सामूहिक आत्महत्या करण्याची वेळ आली आहे,” अशी व्यथा मांडल्याचा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. (Mushrif) यावेळी त्यांनी गोकुळ निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील बैठक आणि महायुतीच्या राजकारणावरही भाष्य केलं.

मुश्रीफ म्हणाले, “कांदा आणि साखर उद्योगाच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत. साखर उद्योगाचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. एका साखर कारखानदाराने तर ‘साहेब, आता सामूहिक आत्महत्या करण्याची वेळ आली आहे,’ अशी हतबल प्रतिक्रिया दिली. बँकांचे कर्ज, कारखान्यांवरील आर्थिक ताण आणि इतर अडचणींमुळे उद्योग अडचणीत सापडला आहे.”ते पुढे म्हणाले, “साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन देणं, कर्जाचं रिस्ट्रक्चरिंग करणं आणि इथेनॉलचे दर वाढवणं, अशा प्रकारचा मार्ग केंद्र सरकार काढेल, अशी अपेक्षा आहे.”(Mushrif) यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीबाबतही माहिती दिली. “काल पक्षाची बैठक झाली. या बैठकीला सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते. सर्वांनी सुनेत्रा पवार यांच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.” असं ते म्हणाले. तसेच तटकरेंच्या नाराजीबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, “आपल्याला टार्गेट केलं जात असल्याची भावना तटकरेंनी व्यक्त केली होती. फक्त दोघांनाच लक्ष्य केलं जात असल्याची खंत त्यांनी मांडली, हे खरं आहे.”
सुनेत्रा पवार यांना अर्थखातं न मिळाल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “सुनेत्रा पवार नुकत्याच उपमुख्यमंत्री झाल्या होत्या. त्यावेळी अर्थसंकल्प येणार होता, त्यामुळे खात्याबाबतचा निर्णय नंतर घेतला जाणार होता. अद्याप त्यांना ते खातं मिळालेलं नसल्याची भावना काहींनी व्यक्त केली असली, तरी त्या सध्या दिल्लीत गेल्या आहेत. (Mushrif) त्यामुळे योग्य निर्णय होईल आणि भाजप त्यांचा सन्मान राखेल, अशी अपेक्षा आहे,” असं ते म्हणाले.२०२९ च्या निवडणुकांबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, “प्रत्येक पक्ष निवडणुकांसाठी स्वतंत्र तयारी करत असतो. मात्र निवडणुका आल्या की सर्वजण एकोप्याने लढतात. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि महायुती एकत्रितपणे निवडणूक लढतील, असं मला वाटतं.”गोकुळ दूध संघ निवडणुकीबाबत त्यांनी सांगितलं की, “कच्ची आणि पक्की मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम ठरला आहे. ही यादी संस्थेकडे जाईल आणि त्यानंतर ठराव पाठवला जाईल. सप्टेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. महायुतीतूनच निवडणूक लढवली जाईल, हे स्पष्ट आहे.”
हेही वाचा
मान्सूनसंदर्भात महत्वाची बातमी ‘या’ तारखेला होणार एन्ट्री