India national cricket team ने गुरुवारी 5 मार्च रोजी England cricket team वर उपांत्य (finals) फेरीत रोमांचक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मुंबईतील Wankhede Stadium येथे झालेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. कर्णधार Suryakumar Yadav यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दमदार कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे. आता अंतिम सामन्यात भारताची भिडंत किवी संघाशी म्हणजेच New Zealand national cricket teamशी होणार आहे.

हा महामुकाबला (finals) रविवारी 8 मार्च रोजी Narendra Modi Stadium येथे खेळवला जाणार आहे. भारत सध्या टी-20 विश्वचषकाचा गतविजेता असल्याने ही ट्रॉफी पुन्हा राखण्यात टीम इंडियाला यश येणार का, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर हवामानाचा संभाव्य परिणाम आणि आयसीसीचे नियम याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच International Cricket Council (ICC) प्रत्येक मोठ्या स्पर्धेतील (finals) उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूद ठेवते. यामागचा उद्देश म्हणजे निर्णायक सामन्याचा निकाल निश्चित व्हावा. त्यानुसार भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना 8 मार्चला नियोजित आहे. मात्र त्या दिवशी पाऊस किंवा इतर कारणांमुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही तर 9 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

मुख्य दिवशी खेळ सुरू होऊन पावसामुळे (finals) तो थांबला, तर राखीव दिवशी सामना तिथूनच पुढे सुरू केला जाईल जिथे तो थांबवण्यात आला होता. त्यामुळे आधी झालेला खेळ वाया जाणार नाही.अंतिम सामन्याबाबत आयसीसीचे नियम द्विपक्षीय मालिकांपेक्षा वेगळे आहेत. सामान्य टी-20 सामन्यात डीएलएस नियम लागू होण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 5 षटके खेळणे आवश्यक असते. मात्र अंतिम सामन्यात निकाल लागण्यासाठी किमान 10 षटकांचा खेळ होणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी खेळ झाल्यास निकाल लावणे शक्य होत नाही.

सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार (finals) आहे. पावसामुळे अडथळे आले तरी पूर्ण 20 षटकांचा खेळ होण्यासाठी आयसीसीने मुख्य दिवशी 90 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला आहे. तर राखीव दिवशी ही अतिरिक्त वेळ 120 मिनिटांपर्यंत असणार आहे.मात्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जर राखीव दिवशीही सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर स्पर्धेच्या नियमांनुसार दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. त्यामुळे हवामानाची परिस्थिती आणि सामन्याचा प्रवाह यावर अंतिम निकाल ठरणार आहे. क्रिकेटप्रेमींना आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या थरारक अंतिम लढतीची उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा :

Bluetooth आणि Wi-Fi सुरू ठेवल्याने खरंच बॅटरी संपते का? तज्ज्ञ म्हणतात

तुमच्या मुलांचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करू नका नाहीतर

शरीरात प्रोटीनची कमी? दररोजच्या आहारात करा या कडधान्याचा समावेश

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *