मराठी चित्रपटसृष्टीतून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘शाळा’ या लोकप्रिय चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता अंशुमन जोशी याने अभिनेत्री अपूर्वा गोरे सोबत लग्नगाठ बांधली आहे. अपूर्वा ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत ईशाची भूमिका साकारत होती. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

‘शाळा’ या गाजलेल्या चित्रपटात मुकुंदची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अंशुमनने आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला आहे. अंशुमन आणि अपूर्वा यांनी पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पाडला. लग्नानंतर दोघांनीही त्यांच्या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. “माझ्यासवे आहेस तू, मजला पुरे ही सार्थता” असे भावूक कॅप्शन देत अपूर्वाने हे सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

लग्नसोहळ्यात अपूर्वाने लाल रंगाची साडी परिधान केली होती, तर अंशुमनने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान करून त्यावर लाल रंगाचा शाल घेतला होता. (the Marathi) या पारंपरिक वेशभूषेत दोघांची जोडी अतिशय आकर्षक दिसत होती. सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटी मित्रांनी या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

लग्नाच्या विधीदरम्यानचा एक भावूक क्षणही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. विधी सुरू असताना अपूर्वा भावूक झाल्याचे दिसून आले. त्या वेळी अंशुमनने तिच्या डोळ्यातील अश्रू हलकेच पुसले. आणखी एका फोटोमध्ये अंशुमनने रडणाऱ्या अपूर्वाला आपल्या मिठीत घेतल्याचेही पाहायला मिळते. हा भावनिक क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.(the Marathi) काही दिवसांपूर्वीच या दोघांनी साखरपुडा करून आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. त्या वेळीही अपूर्वाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून अंशुमन आणि अपूर्वा ही जोडी चर्चेत होती.

दरम्यान, अंशुमन जोशीने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांत काम केले आहे. फास्टर फेणे, फुंतरू आणि फोटोकॉपी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. मात्र शाळा या चित्रपटातील मुकुंदच्या भूमिकेमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली आणि प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण झाली. (the Marathi) आता या लोकप्रिय कलाकाराने आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली असून चाहत्यांकडून या नव्या आयुष्याला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

हेही वाचा :

ही’ FD ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम, 8.10 टक्के दराने परतावा, जाणून घ्या

अखेर इराणची माघार, केली सर्वात मोठी घोषणा, जगाला मोठा दिलासा

पश्चिम बंगालच्या सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या, राष्ट्रपतींच्या अपमानावरून PM मोदींची TMC सरकारवर टीका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *