शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. (water)पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर कायमच स्वच्छ राहते. आज आम्ही तुम्हाला दिवसभरात कोणत्या वेळी पाण्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

पाण्याचे सेवन करताना कायमच योग्य प्रमाणात पाणी प्यावे. अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी(water) घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. आयुर्वेदामध्ये पाण्याला विशेष महत्व आहे. पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन कमी होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला दिवसभरात कोणत्या वेळी पाणी प्यायल्यामुळे शरीराला फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. दिवसभरात या वेळांमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे मानले जाते.

सकाळी उठल्यानंतर पाण्याचे सेवन करावे:
आयुर्वेदामध्ये सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानले जाते. उपाशी पोटी पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होते आणि पोट स्वच्छ होते. कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे पोट साफ होते. याशिवाय शरीराचे मेटाबॉलिझम सुधारते आणि त्वचा चमकदार, ग्लोइंग दिसू लागते. याशिवाय पाण्यात तुम्ही लिंबू किंवा मध मिक्स करून सुद्धा पिऊ शकता.

जेवणाआधी पाण्याचे सेवन:
जेवणाच्या अर्धा तास आधी पाण्याचे सेवन केल्यास पचनक्रियेवर चांगले परिणाम दिसून येतात. पण जेवणाआधी भरपूर पाण्याचे सेवन करू नये. यामुळे पचनक्रिया मंदावते. जास्त पाण्याचे सेवन केल्यामुळे पाचक रसांची तीव्रता कमी होते, ज्यामुळे पचनक्रियेवर गंभीर परिणाम दिसून येतात. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होतात.

अंघोळी आधी पाणी पिण्याचे फायदे:
अनेकांना अंघोळीला जाण्याआधी पाणी पिण्याची सवय असते. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते.यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते आणि हृदयावर जास्तीचा तणाव येत नाही. याशिवाय शरीराचे तापमान अचानक जास्त होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये व्यायाम करण्याआधी पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

अनैतिक संबंधाच्या संशयातून संताप; नवऱ्याने जावयाच्या मुलाचा गुप्तांग तोडला
Oppo F31 सीरीज भारतात लाँच होणार, वाचा फीचर्स आणि किंमत
पतीची हत्या करून ड्रममध्ये ठेवला मृतदेह, पत्नीने प्रेयसीसोबत केली पलायन

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *