अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एका व्यक्तीने चार वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला. या मुलाच्या वडिलांचे आणि आरोपीच्या पत्नीचे अवैध संबंध असल्याचा आरोपीला संशय होता. या क्रूर (Cruel)घटनेची माहिती मिळताच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्या लहान मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथे घडली आहे. गौरीचक पोलीस स्टेशन परिसरातील सोहागी गावात रक्षाबंधनाच्या दिवशी आजोळी आलेल्या मुलासोबत हे क्रूर कृत्य करण्यात आले आहे.

हा मुलगा मूळचा मसौरीच्या धनरुआ ब्लॉक येथे त्याच्या कुटुंबासह राहतो. या चार वर्षीय मुलाच्या वडिलांचे आपल्या पत्नीशी अनैतिक संशय असल्याचा संशय आरोपी गुड्डू पासवानला होता. या संशयावरुन आरोपीने लहान मुलाला लक्ष्य केले.पोलिसांनी दिलेल्या माहिताप्रमाणे, आरोपी गुड्डू पासवानने मुलाला घरी बोलावले. ब्लेडने लहान मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला(Cruel). या घटनेमध्ये आरोपीच्या पत्नीचा सहभाग उघड झालेला नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी पीडित मुलगा त्याच्या आईसोबत आजोळी आला होता. तेव्हा आरोपीने मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवत घरी नेत क्रूर कृत्य केले.

आपल्या बायकोशी मुलाच्या वडिलांचे प्रेमसंबंध असल्याचा आरोपीला संशय होता. या संशयात द्वेषाने भरलेल्या आरोपीने बदला घेण्यासाठी चार वर्षांच्या लहान मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापले. मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोक जमले. मुलाला उपचारासाठी पीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलाच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला ब्लेड देखील जप्त करण्यात आला.
हेही वाचा :
Oppo F31 सीरीज भारतात लाँच होणार, वाचा फीचर्स आणि किंमत
पतीची हत्या करून ड्रममध्ये ठेवला मृतदेह, पत्नीने प्रेयसीसोबत केली पलायन
ध्वनीप्रदूषणामुळे पोलिसांवर NGT चा ‘दणका’; गणेशोत्सवासाठी नवे नियम लागू!