लवकरच भारतात ओप्पो F31 सीरीज; दमदार बॅटरी, आर्मर बॉडी आणि अपग्रेडेड कॅमेऱ्यासह सप्टेंबरमध्ये होणार लाँच
लोकप्रिय स्मार्टफोन(smartphone) निर्माता कंपनी ओप्पो भारतीय बाजारपेठेत लवकरच आपली नवी F31 सीरीज घेऊन येणार आहे. या मालिकेत दोन मॉडेल्स – Oppo F31 आणि Oppo F31 Pro लाँच होणार असून, त्यात आकर्षक फीचर्स आणि जबरदस्त बॅटरी क्षमता मिळणार आहे.

🔹 दमदार बॅटरी आणि आर्मर बॉडी
या सीरीजमधील दोन्ही स्मार्टफोनमध्ये(smartphone) 7000mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात येणार आहे. मागील Oppo F29 Pro मध्ये 6000mAh बॅटरी होती, त्यामुळे या वेळी बॅटरीत मोठा अपग्रेड केला आहे. तसेच कंपनीने या फोनला आर्मर बॉडी दिली असून, पडल्यावर फोन तुटण्याचा धोका कमी होईल. फोनच्या बॉडीला डायमंड कट कॉर्नर डिझाइन दिलं जाईल.
🔹 डिस्प्ले आणि डिझाइन
Oppo F31 5G मध्ये 6.7-इंच AMOLED डिस्प्ले असेल जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या डिस्प्लेवर अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुविधाही असण्याची शक्यता आहे.
🔹 प्रोसेसर आणि परफॉर्मन्स
लीक्सनुसार,
- Oppo F31 (स्टँडर्ड मॉडेल) – Qualcomm Snapdragon 6 Gen 1 चिपसेट
- Oppo F31 Pro – MediaTek Dimensity 7300 Energy चिपसेट
दोन्ही मॉडेल्समध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजची सुविधा मिळू शकते.

🔹 कॅमेरा अपग्रेड
या सीरीजमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. मागील सीरीजच्या तुलनेत कॅमेऱ्यांमध्ये मोठा बदल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
🔹 सॉफ्टवेअर
ही सीरीज नवीनतम Android 15 OS वर चालेल.
🔹 लाँचिंग आणि किंमत
टिपस्टर पारस गुग्लानी यांच्या माहितीनुसार, Oppo F31 सीरीज सप्टेंबर महिन्यात भारतात लाँच होणार आहे. तथापि, याच्या किमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा :
ध्वनीप्रदूषणामुळे पोलिसांवर NGT चा ‘दणका’; गणेशोत्सवासाठी नवे नियम लागू!
नाराजी भोवली! शिंदे गटातून बड्या नेत्याचा राजीनामा
टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर