मध्य पूर्वेत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात तणावाचे (US and Israel) वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका आणि इस्रायल इराणवर सातत्याने हल्ले करत असल्याने अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक राष्ट्रांकडून हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केले जात असतानाच आता आणखी एका घडामोडीने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवली आहे. उत्तर कोरियाने पुन्हा एकदा क्षेपणास्त्र चाचणी केल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे जगाचे लक्ष पुन्हा किम जोंग ऊन यांच्या हालचालींकडे लागले आहे.

उत्तर कोरियाने अवघ्या एका (US and Israel) आठवड्यात दुसऱ्यांदा क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. देशाचे नेते Kim Jong Un यांनी आपल्या मुलीसह नव्याने तयार करण्यात आलेल्या 5,000 टन क्षमतेच्या युद्धनौकेतून या स्ट्रॅटेजिक क्रूझ मिसाइल चाचणीचे निरीक्षण केले. ही चाचणी मंगळवारी उत्तर कोरियाच्या पश्चिम किनाऱ्यावर करण्यात आली. सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यातील ही दुसरी मोठी क्षेपणास्त्र चाचणी ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किम जोंग ऊन यांनी एका गुप्त (US and Israel) ठिकाणावरून व्हिडिओ लिंकद्वारे संपूर्ण चाचणी पाहिली. या वेळी त्यांची मुलगी Kim Ju Ae देखील त्यांच्या सोबत उपस्थित होती. सुमारे 13 वर्षांची असलेली किम जू ए यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या लष्करी कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. जानेवारी 2025 मध्ये झालेल्या एका मिसाइल चाचणीवेळीही ती किम जोंग ऊन यांच्या सोबत दिसली होती. या नव्या चाचणीचा मुख्य उद्देश युद्धासारख्या परिस्थितीत कमांड आणि कंट्रोल सिस्टीमची क्षमता तपासणे हा असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या चाचणीद्वारे देशाने आपली अण्वस्त्र क्षमता अधिक सक्षम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

या चाचणीदरम्यान नव्याने तयार (US and Israel) करण्यात आलेल्या ‘नंबर-51 चोए ह्योन’ नावाच्या युद्धनौकेतून नम्फो किनाऱ्याजवळ अनेक क्रूझ मिसाइल्स डागण्यात आल्या. ही क्षेपणास्त्रे कोरियाच्या पश्चिम समुद्रावर जवळपास तीन तास उड्डाण करत होती आणि त्यानंतर बेटांवर तयार केलेल्या लक्ष्यांवर अचूकपणे आदळली. यापूर्वी 4 मार्च रोजी झालेल्या चाचणीमध्ये याच जहाजावरून पाच मिसाइल्स डागण्यात आल्या होत्या.

चाचणी यशस्वी झाल्यानंतर किम जोंग ऊन यांनी समाधान (US and Israel) व्यक्त केले. त्यांच्या मते या चाचणीमुळे देशाच्या रणनीतिक शस्त्रांच्या कमांड सिस्टीमची विश्वासार्हता आणि युद्धनौकेची लढाऊ क्षमता सिद्ध झाली आहे. त्यांनी असेही म्हटले की उत्तर कोरियाची अण्वस्त्र शक्ती आता नव्या टप्प्यात पोहोचली असून विविध परिस्थितींमध्ये ती वापरण्याची क्षमता देशाने विकसित केली आहे. तसेच देशाची युद्ध रोखण्याची क्षमता अधिक वेगाने मजबूत होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हेही वाचा :

उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेला उजळवण्यासाठी वापरा घरगुती सिरम, बनवण्याची योग्य पद्धत काय?

घोषणा नकोत, कृती हवी!….

10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *