ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स क्षेत्रातील (co-branded credit cards) आघाडीची कंपनी Swiggy ने HDFC Bank च्या सहकार्याने दोन नवीन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड बाजारात आणले आहेत. ‘स्विगी BLCkE’ आणि ‘स्विगी ऑरेंज’ अशी या कार्डांची नावे असून, ग्राहकांना फूड डिलिव्हरीपासून ऑनलाइन शॉपिंग, प्रवास आणि मनोरंजनाच्या खर्चावर आकर्षक कॅशबॅक व सवलती देण्याचा त्यामागचा उद्देश आहे. डिजिटल खर्च वाढत असताना ग्राहकांना अधिक फायदे मिळावेत आणि ऑनलाइन सेवांचा वापर वाढावा, या दृष्टीने ही कार्डे डिझाइन करण्यात आली आहेत.

कंपन्यांच्या दाव्यानुसार, या (co-branded credit cards) कार्डांचा नियमित वापर करणाऱ्या ग्राहकांना एका वर्षात तब्बल 48 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. फूड डिलिव्हरी, क्विक कॉमर्स, ई-कॉमर्स खरेदी आणि प्रवास बुकिंग यांसारख्या विविध खर्चाच्या श्रेणींवर वेगवेगळे रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे नवीन आणि विद्यमान दोन्ही कार्डधारकांना पार्टनर प्लॅटफॉर्मवरही सवलतींचा लाभ मिळणार आहे.
प्रवास आणि लाइफस्टाइल सेवांमध्येही या कार्डांमुळे ग्राहकांना (co-branded credit cards) आकर्षक ऑफर मिळतील. उदाहरणार्थ, Cleartrip द्वारे हॉटेल बुकिंग केल्यास 19 टक्के सूट आणि 5 टक्के कॅशबॅक मिळेल, तर फ्लाइट बुकिंगवर 6 टक्के सूट आणि 5 टक्के कॅशबॅकचा लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर Nykaa अॅपवर शॉपिंग करताना 5 टक्के सूट आणि 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. याशिवाय Amazon, Flipkart आणि Myntra सारख्या लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही कॅशबॅकचा फायदा मिळू शकतो.
स्विगी BLCkE कार्ड प्रामुख्याने जास्त खर्च (co-branded credit cards) करणाऱ्या आणि लाइफस्टाइल कॅटेगरीमध्ये वारंवार व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी तयार करण्यात आले आहे. या कार्डद्वारे स्विगीवर ऑर्डर केल्यास 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळतो, तर एंटरटेनमेंट, ट्रॅव्हल आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक दिला जातो. इतर सर्व व्यवहारांवर 1 टक्के कॅशबॅक मिळणार असून, यासोबत तीन महिन्यांची मानार्थ स्विगी वन BLCkE मेंबरशिपही दिली जाते.
दुसरीकडे ‘स्विगी ऑरेंज’ कार्ड हे दैनंदिन खर्च करणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन (co-branded credit cards) करण्यात आले आहे. स्विगी तसेच इतर रोजच्या ऑनलाइन श्रेणींमध्ये 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक आणि इतर सर्व व्यवहारांवर 1 टक्के कॅशबॅक मिळतो. या कार्डसोबत 12 महिन्यांची स्विगी वन मेंबरशिपही दिली जाते, त्यामुळे फूड डिलिव्हरी आणि किराणा ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांसाठी ते अधिक फायदेशीर ठरू शकते.
दरम्यान, 2023 मध्ये सुरू (co-branded credit cards) करण्यात आलेल्या स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डच्या विद्यमान कार्डधारकांनाही स्विगीच्या इकोसिस्टममध्ये आणि भागीदार प्लॅटफॉर्मवर कॅशबॅकचे फायदे मिळत राहणार असल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड पोर्टफोलिओच्या प्रमुख Vidya Pradeep यांनी सांगितले की, ग्राहकांच्या वेगवेगळ्या खर्चाच्या सवयी लक्षात घेऊन दोन स्वतंत्र व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत, जेणेकरून ग्राहकांना अधिक लवचिकता आणि चांगले रिवॉर्ड्स मिळू शकतील.
हेही वाचा :
उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेला उजळवण्यासाठी वापरा घरगुती सिरम, बनवण्याची योग्य पद्धत काय?
10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय