मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर तणावाचे वातावरण (attacks on ships) निर्माण झाले आहे. विशेषतः Strait of Hormuz परिसरात जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सुरक्षेची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर थायलंडचे “मयूरी नारी” हे महाकाय मालवाहू जहाज भारताकडे येत असताना त्याच्यावर भीषण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हे जहाज Oman जवळील समुद्रात असताना (attacks on ships) अचानक हल्ला करण्यात आला. जहाजावर एकूण 23 खलाशी होते. हल्ल्यानंतर जहाजातून काळा धूर निघताना दिसला तसेच लाइफबोट्स समुद्रात तरंगताना दिसल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर Royal Thai Navy ने तातडीने बचाव मोहीम सुरू केली. नौदलाच्या मदतीने 20 खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, मात्र तीन खलाशी अजूनही जहाजावर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
“मयूरी नारी” हे जहाज थायलंडमधील Precious Shipping PCL या कंपनीच्या मालकीचे आहे. नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, हे जहाज काही काळापूर्वी United Arab Emirates मधील बंदरातून निघाले होते आणि भारताकडे येत होते. हल्ल्यानंतर थायलंडच्या नौदलाने आंतरराष्ट्रीय मदतीने बचावकार्य सुरू केले असून जहाजावरील उर्वरित खलाशांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. या हल्ल्यामागे नेमके कोण आहे याचा शोध घेतला जात आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
दरम्यान, त्याच परिसरात आणखी दोन (attacks on ships) जहाजांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी Iran कडून होर्मुझ मार्गातून जाणाऱ्या जहाजांवर कारवाई करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे या हल्ल्यामागे इराणचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनांमुळे होर्मुझ परिसर सध्या अत्यंत धोकादायक आणि असुरक्षित बनला आहे.
हॉर्मुज सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक मानला (attacks on ships) जातो. हा अरुंद समुद्री मार्ग पर्शियन गल्फला अरबी समुद्राशी जोडतो. जगातील जवळपास 20 टक्के तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक याच मार्गाने होते. Saudi Arabia, United Arab Emirates, Kuwait आणि Iraq हे देश मोठ्या प्रमाणावर तेल निर्यात करत असून त्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.
मात्र या भागातील (attacks on ships) वाढत्या हल्ल्यांमुळे जहाजांची वाहतूक विस्कळीत होत आहे. परिणामी तेलाचा पुरवठा कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक देशांमध्ये इंधनाच्या किमती वाढू लागल्या असून त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि पुरवठा साखळीवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेला उजळवण्यासाठी वापरा घरगुती सिरम, बनवण्याची योग्य पद्धत काय?
10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय