इस्त्रायल-इराण युद्धामुळे जगभरातील आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्रातील (Israel-Iran war) तणाव वाढला आहे. या संघर्षाचा परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागला आहे. भारतातील काही शहरांमध्ये एलपीजी गॅसच्या उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त केली जात असून पुरवठ्यात अडथळे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वयंपाकासाठी घराघरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा पुरवठा आणि त्याचे उत्पादन कसे होते, याबाबतही अनेकांना उत्सुकता आहे.

जगातील एलपीजी उत्पादनात (Israel-Iran war) अमेरिका आघाडीवर आहे. कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करताना आणि नैसर्गिक वायू प्रक्रिया करताना उपउत्पादन म्हणून एलपीजी तयार होते. रिफायनरीमध्ये कच्चे तेल प्रक्रिया करताना विविध प्रकारचे वायू तयार होतात. या वायूंना वेगळे करून साठवले जाते आणि त्यामधील एलपीजी हा महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रगत तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणातील रिफायनरी नेटवर्कमुळे अमेरिका जगभरात एलपीजीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करते.
एलपीजी हा प्रत्यक्षात दोन प्रमुख वायूंच्या मिश्रणातून तयार होतो. प्रोपेन आणि ब्युटेन (Israel-Iran war) हे त्यातील मुख्य घटक आहेत. कच्च्या तेलाच्या रिफायनिंग प्रक्रियेदरम्यान तसेच नैसर्गिक वायू प्रक्रिया करताना हे वायू वेगळे केले जातात. रिफायनरीमध्ये कच्च्या तेलाला उच्च तापमानावर गरम केल्यावर विविध प्रकारचे वायू तयार होतात. त्यामधून प्रोपेन आणि ब्युटेन वेगळे काढले जातात आणि विशिष्ट प्रमाणात एकत्र करून त्यांना द्रवरूप दिले जाते. याच प्रक्रियेमुळे या वायूला ‘लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस’ म्हणजेच एलपीजी असे नाव देण्यात आले आहे.
एलपीजी गॅस (Israel-Iran war) सुरक्षितपणे साठवण्यासाठी आणि वाहतुकीसाठी त्याला जास्त दाबाखाली ठेवले जाते. दाबामुळे हा गॅस द्रवरूपात बदलतो आणि त्यामुळे कमी जागेत अधिक प्रमाणात गॅस साठवता येतो. सिलिंडरमधील रेग्युलेटर सुरू केल्यानंतर द्रवरूपातील एलपीजी पुन्हा वायूरूपात बदलतो आणि त्याच गॅसच्या मदतीने घरांमध्ये स्वयंपाक केला जातो. जागतिक राजकीय परिस्थिती आणि युद्धजन्य तणावामुळे ऊर्जा पुरवठ्याच्या साखळीवर परिणाम होत असल्याने एलपीजीसारख्या इंधनाच्या उपलब्धतेकडे सध्या जगाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेला उजळवण्यासाठी वापरा घरगुती सिरम, बनवण्याची योग्य पद्धत काय?
10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय