इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला फ्रँचायझी स्पर्धा The Hundred च्या 2026 हंगामासाठी (women’s franchise) लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. या लिलावात भारतीय महिला क्रिकेटपटूंनीही लक्ष वेधून घेतले. एकूण 17 भारतीय खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. त्यापैकी सहा खेळाडू गेल्या वर्षीच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते.

लिलावात सर्वात आधी (women’s franchise) बोली लागलेली भारतीय खेळाडू म्हणजे Deepti Sharma. तिला काव्या मारन यांच्या फ्रँचायझी Sunrisers Leeds ने 34 लाखांच्या बेस प्राईसवर आपल्या ताफ्यात घेतले. दीप्ती शर्मासाठी ही दुसरी फ्रँचायझी ठरली आहे. यापूर्वी ती London Spirit कडून दोन हंगाम खेळली होती.दरम्यान, या लिलावात सर्वाधिक किंमत मिळवणारी भारतीय खेळाडू ठरली ती Richa Ghosh. तिच्यासाठी संजीव गोयंका यांच्या मालकीच्या Manchester Super Giants संघाने तब्बल 61 लाख रुपयांची बोली लावली. त्यामुळे येत्या हंगामात ऋचा घोष ही Smriti Mandhana आणि ऑस्ट्रेलियाची दिग्गज खेळाडू Meg Lanning यांच्यासोबत खेळताना दिसणार आहे.
मॅन्चेस्टर सुपर जायंट्स संघात स्मृती मंधाना आधीपासूनच करारबद्ध (women’s franchise) आहे. मात्र मागील हंगामात ती खेळू शकली नव्हती. यंदाच्या स्पर्धेत ती संघासाठी मैदानात उतरणार आहे. या संघात इंग्लंडची फिरकीपटू Sophie Ecclestone देखील आहे. तसेच भारतीय फलंदाज Jemimah Rodrigues हिचाही द हंड्रेडमधील एका फ्रँचायझीसोबत करार झाला आहे.मात्र सर्व भारतीय खेळाडूंना या लिलावात संधी मिळाली नाही. Yastika Bhatia आणि फिरकीपटू Shri Charani या दोन्ही खेळाडू अनसोल्ड राहिल्या. लिलावासाठी नाव नोंदवलेल्या 17 भारतीय खेळाडूंमध्ये दीप्ती शर्मा, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, श्री चरणी, पूजा वस्त्राकर, काश्वी गौतम, शिखा पांडे, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, नंदनी शर्मा, आशा शोभना आणि राधा यादव यांचा समावेश होता.
यंदाच्या हंगामात अनेक भारतीय खेळाडू वेगवेगळ्या संघांकडून खेळताना दिसणार असल्याने The Hundred महिला स्पर्धेची उत्सुकता आणखी वाढली आहे.
हेही वाचा :
उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेला उजळवण्यासाठी वापरा घरगुती सिरम, बनवण्याची योग्य पद्धत काय?
10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय