प्रत्येक तरुण-तरुणीला आयुष्यात स्थैर्य देणारी सरकारी नोकरी (government job) मिळावी, असे स्वप्न असते. त्यातही केंद्रीय सेवांमधील क्लास वन दर्जाच्या नोकऱ्या म्हणजेच आयएएस आणि आयपीएस या पदांची वेगळीच ओढ असते. या पदांपर्यंत पोहोचण्यासाठी देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत यश मिळवावे लागते. कठोर मेहनत, सातत्य आणि प्रचंड आत्मविश्वास यांच्या जोरावर अनेक तरुण-तरुणी आज कमी वयातही ही परीक्षा उत्तीर्ण होत आपले स्वप्न पूर्ण करत आहेत. अशाच यशस्वी अधिकाऱ्यांपैकी एक म्हणजे अंशिका वर्मा.

अंशिका वर्मा यांनी अवघ्या 25 व्या वर्षी यूपीएससी (government job) परीक्षा उत्तीर्ण करत आयपीएस होण्याचे स्वप्न साकार केले. सध्या त्या उत्तर प्रदेश केडरमध्ये कार्यरत असून त्यांच्या कार्यशैलीबरोबरच त्यांची व्यक्तिमत्त्व आणि सौंदर्यही नेहमी चर्चेत असते. त्यांच्या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास आणि स्वतःवरचा विश्वास हीच मोठी ताकद असल्याचे सांगितले जाते.
विशेष म्हणजे अंशिका वर्मा यांनी (government job) कोणत्याही कोचिंग क्लासची मदत न घेता स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर ही कठीण परीक्षा पार केली. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विषयात बीटेकपर्यंत शिक्षण पूर्ण केले. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले, मात्र त्यांनी हार न मानता अभ्यास सुरूच ठेवला. अखेर दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी उत्तम यश मिळवत गुणवत्ता यादीत 136 वा क्रमांक मिळवला आणि आयपीएस अधिकारी बनल्या.
अंशिका वर्मा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही सध्या चर्चा सुरू आहे. लवकरच त्या (government job) विवाहबंधनात अडकणार असून उत्तर प्रदेशमध्येच कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी कृष्ण कुमार बिश्नोई यांच्याशी त्यांचा विवाह होणार आहे. त्यामुळे प्रशासनातील दोन अधिकारी एकत्र येत असल्याने हा विवाहही चर्चेचा विषय ठरत आहे.
3 जानेवारी 1996 रोजी (government job) जन्मलेल्या अंशिका वर्मा यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी मानला जातो. अपयश आल्यानंतरही न डगमगता मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे त्यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिले आहे. UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची कहाणी नक्कीच प्रेरणा देणारी ठरत आहे.
हेही वाचा :
उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेला उजळवण्यासाठी वापरा घरगुती सिरम, बनवण्याची योग्य पद्धत काय?
10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय