महागाई सतत वाढत असताना अनेक कुटुंबांसाठी महिन्याचा खर्च भागवणेच मोठे (big challenge) आव्हान बनले आहे. भाडे, रेशन, वीजबिल, वाहतूक आणि शिक्षण यांसारख्या गरजांच्या खर्चात सातत्याने वाढ होत असल्यामुळे महिन्याच्या शेवटी बचत करणे कठीण वाटते. अनेकांना “इतक्या खर्चात बचत कशी करायची?” असा प्रश्न पडतो. मात्र योग्य नियोजन केल्यास या परिस्थितीतही बचत करणे शक्य आहे.

आजच्या काळात कमाईच्या तुलनेत (big challenge) बचतीचे प्रमाण कमी होत चालले आहे. EMI, मुलांच्या शाळेची फी, घरखर्च आणि इतर जबाबदाऱ्या पाहता अनेकांना आर्थिक ताण जाणवू लागतो. अशा परिस्थितीत आर्थिक शिस्त ठेवणे आणि गुंतवणुकीकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. नियमित बचतीसाठी रिकरिंग डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट (FD), पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) यांसारख्या सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवणूक करता येते. याशिवाय SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातूनही दीर्घकालीन निधी उभारता येतो.
महागाईचा परिणाम अनेकदा आपल्या बचतीवर होतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने 10 लाख (big challenge) रुपयांची एफडी केली, तर त्यावर व्याज मिळते. परंतु त्या व्याजावर कर भरावा लागतो आणि उर्वरित रक्कम महागाईमुळे कमी मूल्याची होते. त्यामुळे प्रत्यक्षात मिळणारा फायदा खूपच मर्यादित राहू शकतो. म्हणजेच तुमचे मुद्दल सुरक्षित राहते, पण संपत्तीमध्ये अपेक्षित वाढ होत नाही.
पैसे वाचवण्याची खरी (big challenge) सुरुवात खर्चाचा अचूक हिशोब ठेवण्यापासून होते. अनेकदा लहान-लहान खर्चांकडे आपण दुर्लक्ष करतो, पण महिन्याच्या शेवटी तेच खर्च मोठी रक्कम बनतात. त्यामुळे रोजचा खर्च डायरीत किंवा मोबाईल अॅपमध्ये नोंदवण्याची सवय लावल्यास महिन्याच्या शेवटी कुठे कपात करता येईल हे स्पष्टपणे लक्षात येते. ठराविक बजेट तयार करून त्यानुसार खर्च करण्याची सवय लावल्यास अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळवता येते.
महागाईच्या काळात गुंतवणुकीसाठी SIP हा एक प्रभावी पर्याय मानला (big challenge) जातो. SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात नियमितपणे लहान रक्कम गुंतवता येते. एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी दरमहा किंवा दर तिमाहीला ठराविक रक्कम गुंतवल्याने दीर्घकालीन निधी तयार होऊ शकतो. बाजारातील चढ-उतारांचा परिणामही अशा गुंतवणुकीवर तुलनेने कमी होतो, त्यामुळे गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करणे सोपे जाते.
याशिवाय पोस्ट ऑफिसच्या किंवा इतर सरकारी अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरू शकते. या योजनांमध्ये सुरक्षिततेसह स्थिर परतावा मिळण्याची शक्यता असते. वाढत्या महागाईच्या काळात अशा योजनांमुळे आर्थिक स्थैर्य राखण्यास मदत होऊ शकते.
तसेच आजच्या डिजिटल युगात (big challenge) अनेकजण विविध ओटीटी प्लॅटफॉर्म, जिम, अॅप्स किंवा मासिकांच्या सबस्क्रिप्शनसाठी पैसे भरतात. मात्र त्यांचा वापर फारसा होत नाही. अशा परिस्थितीत दर महिन्याला आपल्या सर्व सदस्यत्वांची तपासणी करून अनावश्यक सेवा बंद केल्यास खर्चात मोठी बचत होऊ शकते. आवश्यक असल्यास कुटुंबासोबत शेअर करता येणाऱ्या योजना निवडल्यासही खर्च कमी करता येतो.
एकूणच, महागाईच्या काळात आर्थिक शिस्त, योग्य गुंतवणूक आणि (big challenge) अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे या तीन गोष्टींच्या मदतीने कोणतीही व्यक्ती हळूहळू चांगली बचत करू शकते. योग्य नियोजन केल्यास कमी उत्पन्नातही आर्थिक सुरक्षिततेचा पाया मजबूत करता येतो.
हेही वाचा :
उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेला उजळवण्यासाठी वापरा घरगुती सिरम, बनवण्याची योग्य पद्धत काय?
10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय