सध्या आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम जगावर पाहायला मिळत आहे.(Prices) भारतात इंधनाची आयात होत नाहीये. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहे. याचसोबत एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. इंधन कमी झाल्याने पेट्रोल डिझेलचीही निर्मिती कमी झाली आहे. परिणाम हे दर वाढायला सुरुवात झाली आहे.सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना चांगलाच फटका बसत आहे. याचसोबत पेट्रोल डिझेलदेखील संपेल की काय या भीतीने वाहनधारकांनी पेट्रोल पंपाबाहेर रांगा लावल्या आहेत. आज पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घ्या.

आज १३ मार्च २०२६ साठी भारतातील इंधन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे (Prices)नवीन दर जाहीर केलेल आहेत. कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे सध्या वाहनधारकांच्या मनात अनेक संभ्रम आहे. परंतु सध्या तरी पेट्रोल डिझेलच्या दरावर फार परिणाम झालेला नाही. काही शहरात पेट्रोल डिझेलच्या दरात किंचिंत वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
आजचे पेट्रोल डिझेलचे दर
मुंबईत पेट्रोलची किंमत १०४.२१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटर
नवी दिल्लीत पेट्रोलचे दर ९४.७२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा भाव ८७.६२ रुपये प्रति लिटर
कोलकत्ता पेट्रोलचे दर १०३.९४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे भाव ९०.७६ रुपये प्रति लिटर
चेन्नईत पेट्रोलचे दर १००.७५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव ९२.३४ रुपये
अहमदाबादमध्ये पेट्रोलचे दर ९४.४९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.१७ रुपये प्रति लिटर
बंगळुरुत पेट्रोलचे दर १०२.९२ रुपये प्रति लिटर तर (Prices) डिझेलचे दर ८९.०२ रुपये प्रति लिटर
हैदराबादमध्ये पेट्रोलचे भाव १०७.४६ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९.७० रुपये
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?