मार्च महिना सुरू होताच उन्हाचा तडाखा जाणवू लागतो आणि तापमान (rising temperatures) वाढत असल्याने आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते. या दिवसांत शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून अनेकजण आहारात थंड पदार्थांचा समावेश करतात. कारण उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. जर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली आणि त्याकडे दुर्लक्ष केले तर डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. गंभीर परिस्थितीत व्यक्तीला रुग्णालयात दाखल होण्याची वेळही येऊ शकते. त्यामुळे काकडी, टोमॅटो, कलिंगड यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. मात्र काही पदार्थ असेही असतात जे चवीला आवडत असले तरी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत ठरू शकतात.

उन्हाळ्यात शरीरात (rising temperatures) साधारणतः 70 टक्के पाणी असते, परंतु वाढत्या उष्णतेमुळे घाम जास्त प्रमाणात येतो आणि त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते. उष्माघात, उलट्या किंवा जुलाब झाल्यास डिहायड्रेशनचा धोका आणखी वाढतो. त्यामुळे या काळात आहाराची निवड करताना अधिक काळजी घेणे आवश्यक ठरते.
विशेषतः कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन उन्हाळ्यात मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. चहा, कॉफी किंवा कॅफिन असलेली पेये शरीरातून पाणी बाहेर टाकण्याची प्रक्रिया वाढवतात. त्यामुळे वारंवार लघवी होऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे तज्ञांच्या मते, उन्हाळ्यात चहा आणि कॉफीचे सेवन कमी करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
याशिवाय उच्च प्रथिनेयुक्त आहारही मर्यादित प्रमाणात घेणे योग्य (rising temperatures) ठरते. प्रथिने शरीरासाठी आवश्यक असले तरी ते पचण्यासाठी अधिक वेळ लागतो आणि त्यासाठी शरीराला अतिरिक्त पाण्याची गरज भासते. विशेषतः व्यायाम किंवा जिम केल्यानंतर प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास भरपूर पाणी पिणे आवश्यक ठरते, अन्यथा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते.
नमकीन स्नॅक्स आणि तळलेले पदार्थही उन्हाळ्यात समस्या निर्माण करू शकतात. अशा पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील पाण्याचा समतोल बिघडू शकतो. अशा पदार्थांमुळे तहान अधिक लागते आणि शरीरावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो हलका आणि पचायला सोपा आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.
रिफाइंड मैद्यापासून तयार होणारे (rising temperatures) पदार्थही या दिवसांत टाळणे योग्य मानले जाते. मैद्यामध्ये फायबरचे प्रमाण कमी असल्याने तो पचण्यास कठीण असतो आणि त्याला पचवण्यासाठी शरीराला जास्त पाण्याची गरज लागते. त्यामुळे पिझ्झा, बर्गर किंवा मैद्याचे इतर पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना जास्त तहान लागते. यामुळे पचनाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते.
तज्ञांच्या मते लाल मांस, प्रक्रिया केलेले अन्न आणि जास्त तळलेले पदार्थही (rising temperatures) शरीराला लवकर डिहायड्रेट करू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात अशा पदार्थांचे सेवन कमी करणे गरजेचे आहे. योग्य हायड्रेशनसाठी फक्त पाणी पिणे पुरेसे नसते, तर आहारात पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळे आणि भाज्यांचा समावेश करणे आवश्यक असते. काकडी, टोमॅटो, कलिंगड, तसेच दररोज नारळ पाणी पिणे शरीराला थंड ठेवण्यास आणि पाण्याची पातळी संतुलित राखण्यास मदत करते.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?